Balasaheb Thorat : अजब-गजब कारभार, शिवद्रोही मोकाट आणि शिवप्रेमी स्थानबद्ध

Balasaheb Thorat got furious after MVA leaders were placed : छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्यावरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी माफी मागा, अशी मागणी केली होती.
Balasaheb Thorat
Balasaheb ThoratSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : सिंधुदुर्ग इथं छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्यावरून महाविकास आघाडी राज्यातील महायुती सरकारविरोधात चांगलीच आक्रम झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर असतानाच, 'माफी मांगो', असे म्हणत महाविकास आघाडीने नरेंद्र मोदींविरोधात आंदोलन छेडले.

यावरून 'मविआ'च्या नेत्यांना पोलिसांनी अप्रत्यक्षपणे नजरकैदेत ठेवले. काँग्रेस आमदार असलम शेख यांना ताब्यात घेतले. यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी संताप व्यक्त केला आहे. 'शिवद्रोही मोकाट आणि शिवप्रेमी स्थानबद्ध', अशा शब्दात महायुती सरकारच्या नाकार्तेपणावर कडाडले.

विधानसभेमधील काँग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी महायुती सरकारने 'मविआ'च्या मुंबईतील नेत्यांना नजरकैदीत ठेवण्याच्या मुद्यावरून निशाणा साधला आहे. बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या 'एक्स' खात्यावर पोस्ट शेअर केली आहे. शिवद्रोही मोकाट आणि शिवप्रेमी स्थानबद्ध, असे म्हणत, महायुतीवर सरकारवर निशाणा साधला आहे. ही राज्यातल्या महाभ्रष्ट महायुती सरकारची कार्यपद्धती आहे, असा टोला देखील थोरात यांनी लगावला आहे.

या महायुती सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्यांना अद्याप अटक केलेली नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा जाब विचारणाऱ्या काँग्रेस (Congress) नेते आणि कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केले आहे. पोलिस बळाचा वापर करून सरकार शिवप्रेमींचा, महाराष्ट्राचा आवाज दाबू शकत नाही, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले. महाराष्ट्राची जनता आता या शिवद्रोही सरकारला गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे म्हणत, माफी मागा मोदी, असे थोरात यांनी 'एक्स'वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

काँग्रेसवर पलटवार

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दौऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी फक्त नाव नसून, ते आमचे आराध्य दैवत आहे, असे म्हणत त्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन माफी मागतो. परंतु राष्ट्रपुरूष ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला, त्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांची माफी मागायला काही जण तयार नाही, त्यांचा आजही वारंवार अपमान केला जात आहे, न्यायालयीन लढाई लढायला तयार आहेत, अशा शब्दात नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर पलटवार केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com