Jalgaon News: सरकार बदलले अन् 'बलून' बंधाऱ्यांना शासनाची मान्यता मिळाली!

निधी मिळण्यासाठीचा अडसर दूर; राज्य शासनाच्या बैठकीत कार्यवाही.
MP Unmesh Patil
MP Unmesh PatilSarkarnama

भडगाव : गिरणा नदीवरील (Girna river) सात बलून बंधाऱ्यांच्या मागे लागलेले शुक्लकाष्ठ अखेर संपले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra Fadanvis) यांनी या संदर्भात तातडीने बैठक घेऊन बंधाऱ्यांना पर्यावरण मान्यता दिली आहे. त्यामुळे बलून मार्गातील मुख्य अडचण दूर झाली आहे, असे खासदार उन्मेश पाटील (Unmesh Patil) यांनी सांगितले. (MP Unmesh patil got approval from new government)

MP Unmesh Patil
NMC Election: प्रभागरचना बदलल्याने भाजप शिवसेनेला शह देणार?

गेल्या दोन वर्षांपासून राज्य शासनाकडे पर्यावरण मान्यतेसाठी बलून बंधाऱ्यांचे घोडे अडकून राहिले होते. ही मान्यता मिळत नसल्याने केंद्र सरकार राज्य शासनाकडे बोट दाखवून मोकळे झाले होते.

MP Unmesh Patil
BJP News: भाजप नगरसेविका म्हणाल्या, कुठल्या तोंडाने निवडणुकीत मते मागायची!

गिरणा नदीवरील बलून बंधाऱ्यांची २० ते ३० वर्षांपासून मागणी आहे. या संदर्भात भाजप-शिवसेनेच्या काळात अनेक अडचणींवर मात करत बंधाऱ्यांना राज्य शासनाकडून प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यानंतर केद्र सरकारने बंधाऱ्यांना निती आयोगातून निधी देण्यास मान्यता दिली. मात्र त्यासाठी राज्याच्या पर्यावरण विभागाकडून पर्यावरण मान्यता व गुंतवणूक प्रमाणपत्राची आवश्यकता होती.

केंद्राचा ‘पायलट प्रोजेक्ट’

गिरणा नदीतून पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी बंधारे करण्यात यावेत, अशी मागणी ३० वर्षांपासून गिरणा पट्ट्यातून होत आहे. मात्र प्रत्येक वेळी वेगवेगळ्या अडचणींमुळे हा प्रश्न आश्वासनांच्या झुलत्या मनोऱ्यावर तरंगत होता. मात्र आमदार गुलाबराव पाटील, खासदार उन्मेश पाटील, आमदार किशोर पाटील यांच्या पाठपुराव्याने राज्याचे तत्कालीन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने गिरणा नदीवरील या सातही बंधाऱ्यांना डिसेंबर २०१९ मध्ये तत्कालीन राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली, तर त्यानंतर केंद्रीय जलआयोगानेही या बंधाऱ्यांना मान्यता दिली. गिरणा नदीवरील ७८१.३२ कोटींच्या सात बलून बंधाऱ्यांना केंद्रीय जलआयोगाने मंजुरी दिल्याने बंधाऱ्यांचा निधीचा मार्ग मोकळा झाला असून, केंद्राने या बंधाऱ्यांना पायलट प्रोजेक्ट म्हणून मान्यता दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com