NCP Agitation : कर्जत-जामखेड 'MIDC' प्रस्ताव रद्द झाल्याने, राष्ट्रवादी काँग्रेस राम शिंदेंविरोधात आक्रमक!

Rohit Pawar Vs Ram Shinde : कर्जत बंदची हाक देत करण्यात आला रास्ता रोको अन् प्रशासनास निवेदनही देण्यात आले.
Karjat NCP
Karjat NCPSarkarnama
Published on
Updated on

Karjat-Jamkhed MIDC Issue : कर्जत-जामखेडमधील 'एमआयडीसी'वरून भाजपचे माजी मंत्री आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यातील लढाई आता गावपातळीवर पोहचली आहे. आमदार राम शिंदे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत(Uday Samant) यांची दिशाभूल करून एमआयडीसीचा प्रस्ताव रद्द केल्याचा आरोप करत कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँगेस(पवार गट)कडून बंद पुकारात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

कर्जत तालुक्यातील पाटेगाव ग्रामपंचायतीने निवासी जागा आणि बागायती क्षेत्र वगळून मौजे पाटेवाडी-खंडाळा भागात कर्जत-जामखेडची एमआयडीसी व्हावा, असा ठराव दिला आहे. परंतु आमदार राम शिंदे यांच्या राजकीय हस्तक्षेपामुळे हा ठराव बारगळला आरोप आमदार रोहित पवार(Rohit Pawar) यांनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Karjat NCP
Winter Session 2023 : कृष्णा, कोयना खोऱ्यातील पाणी वाटपावरून कुस्ती; जलसंपदामंत्री फडणवीसांनी दिले 'हे' आश्वासन

यानंतर याचे पडसाद गुरुवारी कर्जतमध्ये उमटले. नागपूर येथे युवा संघर्ष यात्रेवर झालेला लाठी हल्ला तसेच कर्जत-जामखेड युवकांच्या अस्मितेचा एमआयडीसी मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असलेला प्रस्ताव रद्द केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने कर्जत बंदची हाक दिली होती. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनास निवेदन देण्यात आले.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी संतप्त भावना व्यक्त करत म्हटले की, ''आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्रातील युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या व्यथा सरकार दरबारी मांडण्यासाठी पुणे-नागपूर युवा संघर्ष पदयात्रा काढली होती. तब्बल 800 किलोमीटर अंतर पार करून यात्रा नागपूर अधिवेशनावर धडकली. परंतु मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाताना पोलिसांनी संघर्ष यात्रा अडवत दडपशाही केली. लाठीहल्ला करून नेत्यांसह युवक कार्यकर्त्याना ताब्यात घेतले.''

Karjat NCP
Political News : मोदी सरकारची एकापेक्षा जास्त उपमुख्यमंत्री पदाच्या फॉर्म्युल्याला का आहे पसंती ?

याशिवाय, '' कर्जतमधील मौजे पाटेवाडी-खंडाळा परिसरात होणारी कर्जत-जामखेड एमआयडीसी हास्यास्पद कारणे दाखवत प्रस्ताव रद्द केला. स्थानिक राजकारण आणि श्रेयवादामुळे विद्यमान सरकार कर्जत-जामखेडच्या युवकांच्या भविष्याशी खेळत आहे.'' असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

यावेळी आमदार राम शिंदेंचा(Ram Shinde) राष्ट्रवादीकडून निषेध करण्यात आला. कैलास शेवाळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील शेलार, काँग्रेसचे किरण पाटील, तात्या ढेरे यांची भाषणे झाली. निवासी नायब तहसीलदार महादेव कारंडे यांनी आंदोलनकर्त्याचे निवेदन स्वीकारले. रास्ता रोकोमुळे दुतर्फा वाहतूक कोंडी झाली होती.

शिंदे पालकमंत्री असताना नीरव मोदीकडून जागा खरेदी -

पालकमंत्री असताना नीरव मोदीने पौंड चलनाद्वारे जमिनीची खरेदी केली. त्यावेळी राम शिंदे झोपले होते काय?, असा सवाल आंदोलकर्त्यांनी केला. रोहित पवार यांनी पाटेवाडी येथे एक एमआयडीसी आणली तर राम शिंदे यांनी देखील दुसरी एक एमआयडीसी आणावी. त्यांचे आम्ही स्वागत करू. केवळ राजकीय श्रेयवादासाठी त्यांनी पाटेवाडी एमआयडीसीला विरोध करणे बंद करावे. असे म्हटले.

तसेच, मतदारसंघातील युवकांच्या रोजगारासाठी एमआयडीसी असणे आवश्यक आहे. राजकारण आणि श्रेयवाद बाजूला करून त्यांनी एमआयडीसीसाठी सहकार्य करावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. देशद्रोही नीरव मोदीची जागेची खरेदी त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात झाल्याचा आरोप आंदोलकर्त्यांनी लावून धरला होता.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com