Crime News Update : ‘नंबर का ब्लॉक केला?’ विचारत कोयता काढला; नृत्यांगनावर रक्तरंजित हल्ल्याचा थरार...

Beed Youth Stabs Dancer at Jamkhed Art Centre in Ahilyanagar, Victim Seriously Injured : बीड गेवराई इथल्या युवकाने जामखेडमधील कला केंद्रावरील नृत्यांगणावर कोयत्याने वार केल्याने गंभीर जखमी झाली आहे.
Jamkhed Crime News Update
Jamkhed Crime News UpdateSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra law and order : बीडमधील युवकाने जामखेड (अहिल्यानगर) इथल्या कला केंद्रावरील नृत्यांगनावर जीवघेणा हल्ला केला आहे. कोयत्याने केलेल्या हल्ल्यात नृत्यांगना गंभीर जखमी झाली आहे. कोयत्याचे वार तिने दोन्ही हातावर झेलल्याने, तिचे दोन्ही हातावर गंभीर वार झाले आहेत.

नृत्यांगनाच्या दोन्ही हाताच्या नसा तुटल्याने तिची प्रकृती गंभीर असून, तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नृत्यांगनाच्या फिर्यादीवरून बीड जिल्ह्यातील राहुल अशोक कचरे (रा. खळेगाव, ता. गेवराई) याच्या विरोधात जामखेड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

जामखेड (Jamkhed) शहरातील तपनेश्वर भागात एका सांस्कृतिक कला केंद्रातील 26 वर्षीय नृत्यांगनेवर तिच्याच मित्राने कोयत्याने वार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघली. या घटनेतील मुख्य संशयित आरोपी हा बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील आहे.

“तू माझ्याशी फोनवर का बोलत नाहीस? माझा नंबर का ब्लॉक केला?" असा जाब विचारत त्याने हा कोयत्याने नृत्यांगनावर हल्ला चढवला. या हल्ल्यात नृत्यांगना गंभीर जखमी झाली असून तिच्यावर जामखेड इथल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी (Police) आरोपीविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Jamkhed Crime News Update
Praful Patel : दिल्ली ते महाराष्ट्र ‘पॉवर गेम’ सुरू! मोदींपासून फडणवीसांपर्यंत ‘पटेल कनेक्शन’! अचानक बैठकींमागे नेमकं काय शिजतंय?

मिळालेल्या माहितीनुसार, खळेगाव (ता. गेवराई, जि बीड) इथला रहिवासी असलेला आरोपी राहुल अशोक कचरे आणि नृत्यांगना यांच्यात मागील पाच वर्षांपासून मैत्रीचे संबंध होते. मात्र, राहुल याच्या त्रासाला कंटाळून महिलेने यापूर्वीही त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. गुरुवारी रात्री आरोपीने फोन करून तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. यानंतर शुक्रवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास जेव्हा नृत्यांगना आपल्या खोलीवर होती, तेव्हा राहुलने तिथे दबा धरून प्रवेश केला.

Jamkhed Crime News Update
BJP Shiv Sena UBT alliance : महापौरपद देतो, साथ द्या! ‘डील पॉलिटिक्स’ सुरू! ठाकरसेनेला भाजपची सत्तेची लालूच?

राहुलने रागाच्या भरात तिच्यावर कोयत्याने हल्ला चढवला. राहुलने नृत्यांगनावर हातावर, बोटांवर आणि डोक्यावर कोयत्याने सपासप वार केले. नृत्यांगनाच्या मैत्रिणीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण राहुलने तिलाही धमकावले आणि “मी तुला संपवूनच टाकणार" असे म्हणत घटनास्थळावरून पसार झाला.

याप्रकरणी नृत्यांगनेच्या फिर्यादीवरून राहुल अशोक कचरे (रा. खळेगाव, ता. गेवराई) याच्या विरोधात जामखेड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी, सहायक निरीक्षक वर्षा जाधव या प्रकरणाचा तपास करत असून पसार राहुलचा शोध घेत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com