Loksabha Election 2024 : भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार कोट्याधीश आहेत. मागील पाच वर्षांत त्यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. त्यांच्या पतीकडे बंगला, जमिनी आणि प्लॉट्स आहेत. त्याच्या संपत्ती वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार(Bharati Pawar) यांनी आज आपल्या उमेदवारी अर्जासोबत मालमत्ता तसेच अन्य माहिती संदर्भात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यांच्यावर न्यायालयात कोणताही खटला प्रलंबित नाही. कोरोना काळात केलेल्या आंदोलनाबाबत ओझर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात एक तक्रार दाखल आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
डॉक्टर पवार यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्वतः पती आणि एकत्र हिंदू कुटुंबाचे (एचयुएफ) असाच स्वतंत्र व एकत्रित तपशील दिला आहे. 2019 मध्ये डॉ पवार यांच्याकडे 53 लाखांची चल आणि 30 लाखांची अचल संपत्ती होती. त्यात वाढ होऊन अनुक्रमे 63 लाख आणि 1.50 कोटी अशी वाढ झाली आहे.
डॉ भारती पवार यांच्याकडे 1.05 लाख तर पती प्रवीण पवार यांच्याकडे 89 हजार रोख रक्कम आहे. डॉक्टर पवार यांच्यानावावर घर नाही मात्र पती प्रवीण पवार यांचे गंगापूर रोड येथे बंगला तसेच दळवट येथे घर आहे. त्याचे एकत्रित मूल्य 90 लाख रुपये आहे.
डॉक्टर भारती पवार यांच्याकडे शेत जमीन नाही त्यांचे पती प्रवीण पवार यांच्याकडे नाशिक तालुक्यात शहरालगत महादेवपुर देवगाव म्हसरूळ तसेच कळवण तालुक्यात दळवट येथे शेत जमीन आहे. त्यांचे मूल्य 2.14 कोटी रुपये आहे. याशिवाय डॉक्टर पवार यांच्या मखमलाबाद येथे असलेले निवासी भूखंडाचे मूल्य दीड कोटी रुपये आहे. त्यांचे पती प्रवीण पवार यांचेही मखमलाबाद येथे दोन निवासी भूखंड आहे त्याचे बाजार मूल्य 15.30 कोटी आहे.
त्यांच्याकडे आठ लाखांची मारुती गाडी आहे याशिवाय पती प्रवीण पवार यांचे गॅस एजन्सी मध्ये 21.59 लाखांची गुंतवणूक आहे त्यांच्या कुटुंबाकडे एकत्रित 9.10 लाखांचे सोने आणि 1.08 लाखांची चांदी आहे. बँक ऑफ बडोदाचे 8.99 लाखांचे समभाग आणि 10.93 लाखांची आयुर्विमा पॉलिसी आहे विविध बँकांमध्ये 16.10 लाखांच्या ठेवी आहेत.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.