Manikrao Kokate Politics: भास्कर जाधव यांचा गंभीर आरोप, माणिकराव कोकाटे यांनाच कृषी खाते नको असावे!

Bhaskar Jadhav; Does Manikrao Kokate deliberately create a new controversy every day?-शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी माणिकराव कोकाटे प्रकरणावर महायुती सरकारला घेरले
Bhaskar Jadhav & Manikrao Kokate
Bhaskar Jadhav & Manikrao KokateSarkarnama
Published on
Updated on

Bhaskarrao Jadhav News: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या रमी खेळत असतानाच्या व्हिडिओचे प्रकरण रोज नवे वळण घेत आहे. श्री कोकाटे यांच्या कृषिमंत्री पदाच्या राजीनाम्यासाठी पक्षात दबाव वाढत आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मात्र ही शक्यता आज फेटाळून लावली.

या संदर्भात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी गंभीर विधान केले. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे ज्या पद्धतीने वर्तन आणि वक्तव्य करीत आहेत, त्यात बरेच काही दडले आहे. कृषिमंत्री पदाचे गांभीर्य श्री कोकाटे यांना नाही हे स्पष्ट होत आहे, असे श्री. जाधव म्हणाले.

कदाचित माणिकराव कोकाटे यांनाच कृषिमंत्री पद नको असावे, त्यामुळेच ते रोज नवा वाद निर्माण करतात. सातत्याने वादग्रस्त विधाने करणाऱ्या कोकाटे यांचा त्यांच्या पक्षाने तातडीने राजीनामा घेणे अपेक्षित आहे. मात्र महायुती सरकार असे काही करण्याचे धाडस करणार नाही.

Bhaskar Jadhav & Manikrao Kokate
Dhule Crime: धक्कादायक; गोळीबार करीत पाच मिनिटात लुटले साडेतीन किलो सोने!

दुसरीकडे विरोधकांनी हा राजकीय मुद्दा लावून धरला आहे ठिकठिकाणी कृषिमंत्री कोकाटे यांच्या विरोधात प्रत्येक खेलो आंदोलन होत आहे आज नाशिक धुळे आणि जळगाव या तिन्ही जिल्ह्यात विरोधकांनी या प्रश्नावर आंदोलन केले येवला येथे रास्ता रोको झाला. त्यामुळे रमीचा वाद कृषिमंत्री कोकाटे यांचा पिच्छा सोडण्यास तयार नाही.

--------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com