Bhusawal News: भाजपचे नगरसेवक रवींद्र उर्फ हंप्या बाबुराव खरात व त्यांच्या कुटुंबीयांचे हत्याकांड पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या हत्याकांडातील आरोपीची जळगाव कारागृहात हत्या झाली आहे. या हत्येमुळे जळगावच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
कारागृहातील बराक क्रमांक चारमध्ये सकाळी सर्व कैद्यांना बाहेर सोडण्यात आले होते. त्यावेळी हा प्रकार घडला. यावेळी मोहसीन अजगर खान (वय ३४) हा झोपला असताना त्याची गळा चिरून हत्या करण्यात आली. त्याच्या छातीवर चाकूने वार करण्यात आले.
नगरसेवक रवींद्र उर्फ हंप्या बाबुराव खरात हत्याकांडातील पाच आरोपींपैकी एक असलेल्या शेखर मोघे यानेच आपल्या टोळीतील मोहसीन खान याची हत्या केली. ही हत्या भुसावळ शहरातील गुन्हेगारीतील वर्चस्व आणि मृत खान हा माफीचा साक्षीदार होईल, या शंकेने करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज तुरुंग प्रशासनाने व्यक्त केला आहे.
भुसावळ शहरात ७ ऑक्टोबर २०१९ रोजी रवींद्र उर्फ हंप्या बाबुराव खरात (Ravindra Kharat Murder)यांच्या कुटुंबातील पाच जणांची हत्या झाली होती. याप्रकरणी अजगर खान, मयुरेश सुरवडे, शेखर हिरालाल मोघे , आकाश सोनवणे आणि गोलू उर्फ अरबाज खान या पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
या सर्व आरोपींना जळगावच्या कारागृहात ठेवण्यात आले होते. यातील खून झालेला मोहसीन खान बराक नंबरचार मध्ये होता. उर्वरित कैदी बराक तीनमध्ये राहत होते. सकाळी सर्व कैद्यांना बाहेर सोडण्यात येते. यावेळी मोहसीन खान बराक मध्येच झोपलेला होता. यावेळी मोघे यांने ही हत्या केली.
हा प्रकार घडल्यानंतर कारागृहात एकच धावपळ उडाली होती. यावेळी कारागृह सुरक्षारक्षकांनी खून करणाऱ्या मोघेला लगेचच ताब्यात घेतले. तुरुंग अधिकारी गजानन पाटील यांनी याबाबत पोलिसांत तक्रार केली. मोघे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहसीन खान आणि त्याच्या कुटुंबीयांचा भुसावळ शहरात चांगलाच दबदबा वाढू लागला होता. दुसरीकडे मोघे याच्या भावाने देखील भुसावळ शहरात जुगाराचा अड्डा सुरू केला होता. गुन्हेगारी क्षेत्रातील वर्चस्व वरून त्यांच्यात स्पर्धा निर्माण झाली होती. मोघे याच्या भावाने नुकतीच कारागृहात भेट घेऊन मोघे याला शहरातील घडामोडींची माहिती दिली होती. त्यानंतर मोघे यांनी मोहसीन खान याचा खून केल्याचे बोलले जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.