Kalyan East MLA Ganpat Gaikwad News: विधान परिषदेच्या 11 जागांसाठी (Maharashtra MLC Elections) आज निवडणूक होत आहे. महायुती आणि आघाडीचे आमदार मतदानासाठी विधीमंडळाच्या दिशेने रवाना झाले आहे. महायुती-आघाडीसाठी एक-एक मत महत्वाचे आहे. नेते मतांची गोळा बेरीज करण्यात गुंतले आहेत.
दुसरीकडे भाजपचे एक आमदार मतदानासाठी जेलमधून थेट विधीमंडळाकडे निघाल्याचे वृत्त साम टिव्हीने दिले आहे. कडेकोट पोलिस बंदोबस्तात भाजपचे आमदार गणपत गायकवाड हे लवकरच मतदानासाठी येणार आहेत.
कल्याण पोलिस ठाण्यात गोळीबार प्रकरणात सध्या गणपत गायकवाड सध्या जेलमध्ये आहेत. विधान परिषद निवडणुकीसाठी आपल्याला मतदाना करण्यास परवानगी द्यावी, असा अर्ज त्यांनी न्यायालयाकडे केला होता. तो अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे. ते पोलिस बंदोबस्तात विधीमंडळात पोहचणार आहेत. गणपत गायकवाड कुणाला मतदान करणार, याची उत्सुकता सगळ्याला लागली आहे.
भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी काही महिन्यांपूर्वी कल्याण पोलिस ठाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. महेश गायकवाड गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर या प्रकरणात भाजप आमदारासह अन्य आरोपींना अटक करण्यात आली होती.
याप्रकरणी त्यांनी शिक्षा सुनावण्यात आली असून सध्या त्यांचा मुक्काम जेलमध्ये आहे. विधान परिषद निवडणुकीत मतदान करता यावे, यासाठी त्यांनी कल्याण अतिरिक्त जिल्हा न्यायालयाला विनंती अर्ज केला होता, तो मान्य करण्यात आला आहे.
विधान परिषद निवडणुकीसाठी अजितदादा गटाने राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे यांना मैदानात उतरवलं आहे. शिंदे गटाने भावना गवळी आणि कृपाल तुमाने या दोन उमेदवारांना तिकीट दिलं आहे.
काँग्रेसने प्रज्ञा सातव आणि शेकापने जयंत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. जयंत पाटील हे शरद पवार गट पुरस्कृत उमेदवार आहेत. उद्धव ठाकरे गटाने मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिली जात आहे.भाजपने पाच उमेदवार दिले आहेत. पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, डॉ. परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.