Bhusawal Nagar Palika Election Result : मंत्री संजय सावकारेंच्या पत्नीला शरद पवारांच्या उमेदवाराने केलं पराभूत

रजनी सावकारेंचा अवघ्या 1847 मतांनी पराभव झाला. तेथून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या गायत्री भंगाळे निवडून आल्या आहेत. जिल्ह्यात भाजपचे सहा, शिंदे सेनेने सहा, उबाठा आघाडी दोन आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने एक जागेवर तर एका ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.
Minister Sanjay Savkare
Minister Sanjay SavkareSarkarnama
Published on
Updated on

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, मुक्ताईनगर , फैजपूर, धरणगाव, सावदा, जामनेर, यावल, भुसावळ, वरणगाव, नशिराबाद, शेंदुर्णी, रावेर, एरंडोल यासह १८ नगरपरिषदांसाठी मतदान झाले होते. आजच्या मतमोजणी धक्कादायक निकाल समोर आले आहेत.

या निवडणुकीत भुसावळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणात होत्या. मात्र त्यांचा पराभव झाला आहे. रजनी सावकारेंचा अवघ्या 1847 मतांनी पराभव झाला. तेथून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या गायत्री भंगाळे निवडून आल्या आहेत. जिल्ह्यात भाजपचे सहा, शिंदे सेनेने सहा, उबाठा आघाडी दोन आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने एक जागेवर तर एका ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.

धरणगाव नगरपरिषद निवडणुकीत राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. येथे नगराध्यक्षपदी ठाकरे सेनेच्या लीलाबाई चौधरी विजयी झाल्या आहेत. शेंदुर्णी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी भाजपचे गोविंद अग्रवाल, पाचोराच्या शिंदे सेनेच्या सुनिता किशोर पाटील, एरंडोलच्या नगराध्यक्षपदी भाजपचे नरेंद्र ठाकूर, नशिराबादच्या नगराध्यक्षपदी भाजपचे योगेश नारायण पाटील तर पारोळाच्या नगराध्यक्षपदी शिंदे सेनेचे चंद्रकात पाटील विजयी झाले आहेत.

इगतपुरी (जि.नाशिक) नगरपरिषदेचा धक्कादायक निकाल लागला आहे. 30 वर्ष एकहाती सत्ता असलेल्या नगराध्यक्षाचा पराभव झाला असून येथे शिंदे सेनेच्या उमेदवाराने बाजी मारली आहे. गेल्या तीस वर्षापासून इगतपुरी नगरपरिषदेवर एकहाती सत्ता ठेवणारे माजी नगराध्यक्ष संजय इंदुलकर यांचा शिवसेना शिंदे गटाचे मंगेश शिरोळे यांनी पराभव केला आहे.

नाशिक जिल्ह्यात एकूण 11 नगरपरिषदांसाठी मतमोजणी सुरु आहे. यातील 6 नगरपरिषदांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इगतपुरी नगर परिषद हा ठाकरे गटाचा गड म्हणून ओळखला जातो. इगतपुरीमध्ये सर्वच प्रमुख उमेदवारांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने ठाकरेंसाठी हा मोठा धक्का होता. यासोबतच अजित पवार आणि शिंदे गट ही इथे भाजप विरोधात मैदानात होता. पण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार मंगेश शिरोळे यांनी संजय इंदुलकर यांचा पराभव केला आहे.

जळगाव जिल्ह्यातील आत्तापर्यंत निकाल

जामनेर : भाजपच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार साधना महाजन बिनविरोध विजय

वरणगाव : वरणगाव येथे नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार सुनील काळे विजयी..

नशिराबाद : भाजपचे उमेदवार योगेश पाटील विजयी

पारोळा – शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार डॉक्टर चंद्रकांत पाटील विजयी

चोपडा -नगर परिषदेच्या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार नम्रता पाटील विजयी

यावल – शिवसेना ठाकरे गटाच्या छाया पाटील आघाडीवर

फैजपूर – भाजपच्या उमेदवार दामिनी सराफ विजयी

धरणगाव – शहर विकास आघाडीच्या उमेदवार लीलाबाई चौधरी विजयी

अमळनेर येथे शिवसेना शिंदे गटाचे डॉक्टर परीक्षित बाविस्कर विजयी

चाळीसगाव : भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रतिभा मंगेश चव्हाण विजयी

पाचोरा: शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या पत्नी सुनीता किशोर पाटील विजयी

शेंदुर्णी : भाजपचे गोविंदा अग्रवाल विजयी

मुक्ताईनगर : शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या संजना पाटील विजयी.

एरंडोल : भाजपचे उमेदवार डॉक्टर नरेंद्र पाटील विजय

भडगाव : शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार रेखा मालचे विजयी

रावेर : भाजपचे उमेदवार संगीता महाजन विजय

सावदा : भाजपचे उमेदवार रेणुका पाटील विजयी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com