Shrigonda Political: श्रीगोंद्यात मोठा ट्विस्ट; नागवडेंनी टायमिंग साधले, थोरातांच्या वाढदिवसालाच दिला काॅंग्रेसचा राजीनामा

Political News : श्रीगोंद्यातील नागवडे पती-पत्नी २० फेब्रुवारीला राष्ट्रवादीत प्रवेश करणार
Anuradha Nagwade
Anuradha NagwadeSarkarnama
Published on
Updated on

Nagar News : श्रीगोंद्यातील नेते राजेंद्र नागवडे आणि त्यांच्या पत्नी अनुराधा यांनी काॅंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा टायमिंग साधला आहे. काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) वाढदिवस साजरा करण्याच्या दिवसीच नागवडे पती-पत्नीने राजीनामा दिल्याने चर्चेत आला आहे. नागवडेंचा हा राजीनामा थोरातांना वाढदिवसानिमित्तान दिलेली भेट तर नाही ना, अशी चर्चा रंगली आहे.

काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन टाकला असल्याची माहिती देत कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत अनुराधा नागवडे यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळो अथवा ना मिळो उमेदवारी करणार असल्याचा निर्धार नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केला.

Anuradha Nagwade
Shambhuraj Desai On Thackeray : आजही आम्ही ठाकरेंचा आदरच करतो; शिंदेंच्या मंत्र्यांचं 'मातोश्री'प्रेम!

आगामी राजकीय वाटचालीची दिशा ठरविणेबाबत नागवडे समर्थकांची बैठक श्रीगोंदा येथे घेण्यात आली. कारखान्याचे माजी संचालक जिजाराम खामकर हे अध्यक्षस्थानी होते. राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहटा, बाबासाहेब भोस, राकेश पाचपुते, सुभाष शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्याबाबत सर्व कार्यकर्त्यांच्या सूचना विचारात घेऊन काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा अनुराधा नागवडे, राजेंद्र नागवडे या दोघा उभयतांनी मंगळवारी काँग्रेस श्रेष्ठींकडे राजीनामा पाठविला. नागवडे पती-पत्नी २० फेब्रुवारीला राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणा राजेंद्र नागवडे यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राजेंद्र नागवडे म्हणाले, विधानसभेची उमेदवारी मिळो अगर ना मिळो. अनुराधा नागवडे विधानसभा लढविणारच आहेत. अनुराधा नागवडे यांच्या माध्यमातून सर्व कार्यकर्ते आमदार होणार असून यासाठी महायुती सरकारच पाठबळ मिळणार आहे. श्रीगोंदेकरांना अभिमान वाटेल, असे काम करायचे आहे. राजकारणात गॉडफादर हवा असतो. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते अजित पवार यांच्याशी चर्चा झाली आहे. येणाऱ्या काळात ते पाठबळ देण्याच्या तयारीत आहे, तशी त्यांनी भूमिका देखील मांडली घेतली. या राजकीय प्रक्रियेत बाळासाहेब नाहटा यांनी महत्वाची भूमिका पार पाडल्याचेही राजेंद्र नागवडे यांनी म्हटले.

बाळासाहेब नाहाटा यांनी राजेंद्र नागवडे यांनी मागील दोन विधानसभा निवडणुकीत इतरांना मदत करत आमदार केले. बापूंच्या आशीर्वादाने सत्ता असो, अथवा नसो समाजकार्य सुरूच ठेवले. सर्वसामान्य जनतेचा आजही नागवडे कुटुंबावर विश्वास आहे. राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नागवडे परिवाराला पाठबळ मिळत असल्याने अनुराधा नागवडे (Anuradha Nagawade) या आमदार होतील, असा विश्वासाने सांगितले.

(Edited by Sachin waghmare)

Anuradha Nagwade
Shrigonda Vidhansabha; सगळ्यांना व्हायचं आमदार ; कोण ठरणार दमदार |Anuradha Nagwade ।Ghanshyam Shelar

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com