भाजप नेत्यांनी आमदार शाह यांच्या फोटोला जोडे मारले

सटाणा येथे भाजपने एमआयएमचे धुळ्याचे आमदार फारुख शाह यांच्या फोटोला काळे फासून जोडे मारो आंदोलन केले.
BJP agitation at Satana
BJP agitation at SatanaSarkarnama
Published on
Updated on

सटाणा : धुळ्याचे (Dhule) खासदार डॉ. सुभाष भामरे (Dr. Subhash Bhamre) यांनी विकासकामांच्या निधीला स्थगिती दिल्याचा बेछूट आरोप करीत एमआयएम (AIMIM) महिला आघाडीतर्फे खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या छायाचित्राची छेडछाड करण्यात आली होती. त्याचा निषेध (Protest) म्हणून येथील सटाणा शहर भाजपच्या (BJP) पदाधिकाऱ्यांनी धुळ्याचे एमआयएमचे आमदार फारुख शाह (Faruk Shah) यांच्या फोटोला काळे फासत जोडे मारो आंदोलन (Agitation) करण्यात आले. त्यानंतर शहा यांची प्रतिमा जाळण्यात आली. (BJP protest against AIMIM MLA Faruk shah of Dhule)

BJP agitation at Satana
अब्दुल सत्तार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत

शुक्रवारी येथील तहसीलदार कार्यालयासमोर भाजपच्या शेकडो संतप्त कार्यकर्त्यांनी आमदार फारुख शाह यांच्या निषेधार्थ प्रचंड घोषणाबाजी केली.

BJP agitation at Satana
`सारथी`च्या माध्यमातून नोकऱ्या देणारे तयार व्हावेत!

यावेळी शहराध्यक्ष राहुल सोनवणे म्हणाले, आमदार शहा यांनी देवपुरातील रस्त्यांसाठी त्यांच्या स्थानिक विकास निधीचा मंजूर केलेला ३० कोटींचा निधी मुस्लिम भागातील कामांवर खर्च केला. देवपुरसाठी २० टक्के निधीही वापरला नाही. देवपुरच्या रस्त्यासाठी शासनाकडे निधी मागण्यासाठी गेल्यावर ही बाब लक्षात आली. म्हणून राज्य शासनाने त्यास स्थगिती दिली.

यामध्ये खासदार सुभाष भामरे यांचा संबंध नसताना त्यांची बदनामी खपवून घेणार नाहीत. उलट खासदारांनी मंजूर केलेल्या काही विकासकामांचे श्रेयही आमदार शाहा घेत असल्याचा आरोपही शहराध्यक्ष राहुल सोनवणे यांनी केला. बेताल व्यक्तव्य करणाऱ्या आमदार शहा यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही या वेळी करण्यात आली. याबाबतचे निवेदन पोलिस निरिक्षक सुभाष अनमूलवार यांना देण्यात आले.

या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष संजय देवरे, ज्येष्ठनेते साहेबराव सोनवणे, श्रीधर कोठावदे, सुरेश सोनवणे, माजी नगरसेवक मुन्ना शेख, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष मंगेश खैरनार, प्रांतिक अध्यक्ष अनिल पाकळे यांसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com