Shani Shingnapur Devasthan scam : भ्रष्टाचार अन् लुटीचा शनिशिंगणापूर पॅटर्न; न्याय देवताच्या दरबारातील भ्रष्टाचाराचा भयावह नमुना

Devendra Fadnavis Exposes Shani Shingnapur Temple Trust Corruption in Legislature : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यानगरमधील शनिशिंगणापूर इथल्या श्री शनैश्र्वर देवस्थान ट्रस्ट विश्वस्त मंडळाने केलेल्या भ्रष्टाचाराची माहिती विधिमंडळात मांडली.
Shani Shingnapur Devasthan scam
Shani Shingnapur Devasthan scamSarkarnama
Published on
Updated on

Shani temple trust corruption : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूरच्या श्री शनैश्र्वर देवस्थान ट्रस्ट विश्वस्त मंडळात झालेल्या भ्रष्टाचाराची माहिती विधिमंडळात मांडली. यानंतर देवस्थानमधील भ्रष्टाचार अन् लुटीचा शनिशिंगणापूर पॅटर्न राज्यसह देशभरात चर्चेत आला आहे.

शनिशिंगणापूरचं अध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व मोठं आहे. शनिदेवाला न्यायाची देवता मानले जाते. शनीच्या साडेसाती आणि धैर्याच्या काळात, भाविक शनिशिंगणापूर इथं हजेरी लावत शनिदेवाची पूजा करून शांती आणि संरक्षण मिळवण्यासाठी येतात. आता त्याच न्याय देवताच्या दरबारातील भ्रष्टाचाराने भक्त हादरला आहे.

नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूरमधील शनिदेवाची मूर्ती स्वयंभू असल्यांचं मानलं जातं. म्हणजे ती नैसर्गिकरित्या प्रकट झाल्याची कथा आहे. न्याय देवता असल्याने या मंदिराला (Temples) दरवाजे किंवा छत नाही. भाविकांचा असा विश्वास आहे की, शनिदेवाला घराच्या संरक्षणाची गरज नाही, कारण तो स्वतःच गावाला आणि गावकऱ्यांचे रक्षण करतो. या गावाला दरवाजे नसल्यामुळे, इथं चोरी होत नाही, असा लोकांचा दृढ विश्वास आहे. जर कोणी चोरी करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला शनिदेवाच्या प्रकोपामुळे शिक्षा होईल, अशी त्यांची श्रद्धा आहे. पण देवस्थानमधील भ्रष्टाचारामुळे याच श्रद्धेला जबर तडा केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी श्री शनैश्वर ट्रस्ट विश्वस्त मंडळातील भ्रष्टाचाराच्या विधी व न्याय विभागाचा चौकशी अहवाल सादर केला. हा अहवाल सादर करताना, "ईश्वराच्या स्थळी देखील भ्रष्टाचाराचा भयावह नमुना समोर येत आहे", असा स्पष्ट नमूद केलं. एकेकाळी केवळ 250 ते 300 कर्मचाऱ्यांवर चालणारा देवस्थानचा कारभार आज 2474 कर्मचाऱ्यांपर्यंत फुगवण्यात आला आहे, ज्यात बहुसंख्य कर्मचारी अस्तित्वातच नाहीत.

Shani Shingnapur Devasthan scam
Rohit Pawar ED chargesheet : रोहित, पवारसाहेबांचं रक्त, लढणारच! 'ईडी'च्या दोषारोपपत्रावर जितेंद्र आव्हाडांची सूचक प्रतिक्रिया

चौकशी अहवालातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. उदाहरणार्थ, देवस्थानच्या रुग्णालयात फक्त 15 खाटा असताना 80 वैद्यकीय अधिकारी आणि 247 अकुशल कर्मचाऱ्यांची नियुक्ती दाखवण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र केवळ 4 डॉक्टर आणि 1 कर्मचारी कार्यरत असल्याचे आढळले.

Shani Shingnapur Devasthan scam
Amar Kale BJP criticism : शिंदेंच्या दोन्ही 'संजय' कृत्यावर पवारांचा शिलेदार भडकला; म्हणाला, 'करतेय महायुती सरकार, लाज वाटतेय..!'

नसलेल्या बागेसाठी 80 कर्मचाऱ्यांची नियुक्ती

तसेच, अस्तित्वात नसलेल्या बागेच्या देखरेखीसाठी 80 कर्मचारी नेमल्याचे दाखवले गेले. 109 खोल्यांच्या भक्तनिवासासाठी 200 कर्मचारी दाखवले गेले, प्रत्यक्षात मात्र 10 पेक्षाही कमी कर्मचारी होते. तेल विक्री आणि देणगी संकलनासाठी फक्त 12 काउंटर असताना त्यावर 352 कर्मचारी दाखवण्यात आले. वाहनतळासाठी 63, वृक्षसंवर्धनासाठी 83, शेती विभागासाठी 65, विद्युत विभागासाठी 200 आणि सुरक्षा विभागासाठी 315 कर्मचारी दाखवण्यात आले.

बनावट भरती उघडकीस

एकंदरीत सर्व भरती बनावट असल्याचे चौकशी अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. कोणतीही हजेरी पुस्तके, कर्मचारी मस्टर किंवा उपस्थितीचे अधिकृत दस्तावेज अस्तित्वात नसल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे दोषींवर एफआयआर दाखल करण्याचे आदेश देण्यात आले असून, चौकशी पूर्ण झाल्यानंतर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील.

सरकारी ऑडिटर रडारवर

मुख्यमंत्र्यांनी शिर्डी आणि पंढरपूरप्रमाणे या देवस्थानासाठी देखील स्वतंत्र प्रशासकीय मंडळ स्थापन करण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी करण्यात आलेल्या ऑडिटमध्ये सरकारी ऑडिटरने क्लीन चिट दिली होती, मात्र त्याच्याविरुद्ध आणि संबंधित विश्वस्त व कर्मचाऱ्यांविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

अ‍ॅप घोटाळा वेगळाच...

शनिदेवाच्या मंदिराच्या देवस्थानात झालेला मोठा गैरव्यवहार उघड झाल्याच्या प्रकरणावर आमदार विठ्ठलराव लंघे यांनी भाविकांची अ‍ॅपद्वारे करण्यात आलेल्या फसवणुकीकडे लक्ष वेधले. प्रत्येक अ‍ॅपवर दोन लाख भाविकांची नोंद असून, प्रत्येक 1800 रुपये देणगी आकारली गेली. या माध्यमातून मोठा निधी गोळा करण्यात आला. परंतु तो थेट देवस्थानच्या अधिकृत खात्यावर न जाता खासगी बँक खात्यात वर्ग करण्यात आला. भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेताना, गोशाळा, अन्नदान, पूजा, अभिषेकाच्या नावाखाली देणगी उकळली गेली. सायबर क्राइम सेलकडे तक्रार दाखल आहे. पण गुन्हा दाखल झालेला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com