आमदार सीमा हिरे, हिरामण खोसकरांच्या पत्राचा गैरवापर खरा की खोटा?

भाजप व काँग्रेस आमदारांच्या पत्रांचा वापर करून शासकीय यंत्रणेवर दबाव
Seema Hire & Hiraman Khoskar
Seema Hire & Hiraman KhoskarSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : महापालिकेची रितसर परवानगी घेतलेल्या एका बांधकामाच्या प्रकल्पात अचानक प्रशासनाचीच बाधा आली. यातून एका महिलेसाठी भाजपच्या आमदार सीमा हिरे (BJP MLA Seema Hire) आणि काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर (Congress MLA Hiraman Khoskar) यांनी पत्र दिल्याचे उघड झाले आहे. ही महिला तंत्र-मंत्र करणारी असल्याचे बोलले जाते. त्यामुळे हे प्रकरण उघडकीस येताच संबंधित आमदारांनी कानावर हात ठेवत पत्राचा गैरवापर झाल्याचा दावा केल्याने खळबळ उडाली आहे.

Seema Hire & Hiraman Khoskar
जळगाव शहर `खड्ड्यात` घालण्याचा भाजपचा कट?

शहरात आनंदवली भागात एक बांधकाम प्रकल्प मंजूर झाला. या जागेशेजारी एका महिलेची जागा आहे. विशेष म्हणजे, ही जागा संबंधित प्रोजेक्टच्या मूळ मालकांनी दिली आहे. या महिलेकडे शहरातील अनेक व्यक्तींचे येणे-जाणे असते. त्यात काही लोकप्रतिनिधींचाही समावेश असल्याची माहिती आहे. प्रोजेक्टच्या मूळ मालकांना त्रास देण्याचा प्रयत्न म्हणजे उपरोक्त महिलेला रस्ता उपलब्ध करून देण्यासाठीचा खटाटोप असल्याचे या मूळ मालकांचे म्हणणे आहे. या महिलेच्या जागेत सतत काहीतरी विधी सुरू असतात. मोठ्या प्रमाणात चरबीयुक्त मांस पक्ष्यांना खाण्यासाठी खुलेआम ठेवले जाते. त्यामुळे कावळे, घारी इथे जमतात. हे मांसाचे तुकडे पक्ष्यांच्या चोचीतून पडून परिसरात विखुरले जाऊन दुर्गंधी निर्माण होते. या महिलेच्या जागेसाठी इमारतीतून रस्ता देण्यात यावा,यासाठी हा खटाटोप सुरू असल्याचा या रहिवाशांचा आरोप आहे. रेरा आणि महापालिका या दोघा संस्थांनी बांधकामाची रीतसर परवानगी दिल्यानंतर आता त्यात बदल करण्यासाठी बेकायदेशीर पद्धतीने दबाव निर्माण केला जात असल्याचा आरोप होत आहे.

Seema Hire & Hiraman Khoskar
देशाचे राजकारण करायचे अन् गावातला सरपंच ऐकत नाही!

आमदार असलेले लोकप्रतिनिधी सतत लोकांच्या संपर्कात असतात. वेळोवेळी दाखले देण्यासाठी त्यांचे लेटरहेड हे त्यांच्या कार्यालयात उपलब्ध असतात. आमदारांच्या कार्यालयातील मंडळी लोकांच्या गरजेनुसार हे लेटरहेड उपलब्ध करून देतात. मात्र या प्रकरणात शासनाकडे खोट्या तक्रारी करण्यासाठी आमदार सीमा हिरे आणि आमदार हिरामण खोसकर यांच्या लेटरहेडचा सर्रास वापर करण्यात आला, ही अतिशय गंभीर बाबही समोर आली. त्याद्वारे दिशाभूल करणारी माहिती शासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आली.

आमदारांचे पत्र आल्यानंतर शासकीय यंत्रणाही कामाला लागल्या. प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच असल्याचे या आमदारांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आपले पत्र मागे घेत असल्याचे दुसरे पत्र सादर करण्याची वेळ या आमदारांवर ओढावली. त्यामुळे हे सगळे प्रकार कोण, कोणासाठी करत आहे. कायद्याचे खुलेआमपणे उल्लंघन करून खोट्या तक्रारी करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्याचे आव्हान पोलिस यंत्रणेसमोर आहे.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com