भाजप नगरसेविकेच्या पतीला मारहाण करीत कपडे फाडले!

नागरिक व नगरसेवक पतीची कपडे फाटेपर्यंत जुंपली
Dinesh Bagul & Rajesh Nimbalkar
Dinesh Bagul & Rajesh NimbalkarSarkarnama
Published on
Updated on

धुळे : शहरातील (Dhule) प्रभाग अकरामधील विश्‍वकर्मा कॉलनीत गटारीचे पाणी तुंबत असल्याच्या कारणावरून गुरुवारी महापालिकेत आंदोलन करणारे रजनीश निंबाळकर आणि याच प्रभागातील भाजपच्या (BJP) नगरसेविकेचे पती दिनेश बागूल यांच्यात शुक्रवारी दुपारी जोरदार हाणामारी झाली. त्यांच्यात एकमेकांचे कपडे फाटेपर्यंत जुंपली. दोघांना किरकोळ दुखापतही झाली. पोलिस (Police) ठाण्यात वाद न पोहोचता तो सायंकाळनंतर आपापसांत मिटविण्यात आला.

Dinesh Bagul & Rajesh Nimbalkar
नाशिकच्या ४ आमदारांवर लाचलुचपत विभागाच्या कारवाईचे संकट?

विश्‍वकर्मा कॉलनीत मंदिर आहे. त्यालगत गटार आहे. ती तुंबल्याने परिसरात गंभीर प्रश्‍न निर्माण झाला. रहिवाशांना प्रसंगी पसरलेल्या गटारीच्या पाण्यातून जावे लागते. या कारणावरून गुरुवारी निंबाळकर यांच्यासह परिसरातील रहिवाशांनी गटारीचे पाणी महापालिकेत आणून आयुक्त देविदास टेकाळे यांच्या दालनासमोर ओतले. तसेच आयुक्तांच्या दालनासमोरच ठिय्या आंदोलन केले.

Dinesh Bagul & Rajesh Nimbalkar
नगरसेवकाची विनवणी...बिटको रुग्णालयच आजारी रुग्णांनी कुठे जावे!

प्रभाग अकराच्या नगरसेविका लक्ष्मी बागूल यांच्या प्रभागातील समस्येबाबत निंबाळकर यांच्यासह परिसरातील रहिवाशांनी आंदोलन केल्याने नगरसेविकेचे पती दिनेश बागूल यांना राग आला. त्यानुसार बागूल व निंबाळकर शुक्रवारी गल्ली क्रमांक पाचमधील जयजवान चौकात समोरासमोर आले. बागूल यांनी निंबाळकर यांना आंदोलनाबाबत जाब विचारला. त्यांच्यातील शाब्दिक वाद विकोपाला गेला. त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले.

दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यात बागूल यांच्या डोळ्याजवळ दुखापत झाली, निंबाळकर यांनाही मुकामार लागला. दोघांचे कपडेही फाटले. नंतर हा वाद थेट आझादनगर पोलिस ठाण्यात पोहोचला. मात्र, आपापसांत सामंजस्याने हा वाद मिटविण्यात आला. त्यामुळे आझादनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कुठलाही गुन्हा दाखल झालेला नव्हता.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com