BJP Politics: नगरपालिका निवडणुकांत लक्ष्मी प्रसन्न?, दुपारी शुकशुकाट सायंकाळी मतदानासाठी जत्रा, सत्ताधाऱ्यांची चलती!

BJP Girish Mahajan Nashik Municipal Council Elections Money and Muscle Power Impact Mahayuti Conflict-व्यक्तिगत प्रतिष्ठा पणाला लागल्याने महायुतीतील नेत्यांनीच विरोधकांची उणीव भरून काढत केले परस्परांचे वस्त्रहरण
Girish-Mahajan
Girish-MahajanSarkarnama
Published on
Updated on

Municipal Election News: जिल्ह्यात अकरा नगरपालिकांच्या निवडणुका मंगळवारी झाल्या. यामध्ये सिन्नरचा अपवाद वगळता सर्वत्र महायुतीचे नेतेच परस्परांविरुद्ध लढताना दिसले. त्यामुळे भाजपची रणनीती यशस्वी झाल्याचे चित्र आहे.

नाशिक जिल्ह्यातील निवडणुका भाजप जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली लढली. मंत्री महाजन यांनी सहकारी पक्षांना युती करायची की नाही, याबाबत नेमका संदेश दिलाच नाही. त्यामुळे महायुतीतील घटक पक्षच एकमेकांविरुद्ध लढले.

महायुतीत राजकीय वाद होतील. त्यातून प्रबळ उमेदवार आणि नाराज नेते विरोधकांशी हात मिळवणी करतील. हा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा आणि महाविकास आघाडीचा अंदाज फोल ठरला. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांची कोंडी झाली.

Girish-Mahajan
EVM machine change controversy : ईव्हीएम बदलले, बिघाडलेल्या मशीन न दाखवल्याने वादाला तोंड फुटले; राहाता इथल्या मशिनवर कमळ चिन्हं ठळक दिसायचे!

जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर, चांदवड, ओझर, पिंपळगाव बसवंत, सिन्नर आणि सटाणा या सहा ठिकाणी भाजपने अपवाद वगळता स्वबळावर उमेदवार दिले. येवल्यात मंत्री छगन भुजबळ यांच्या भाजपने युती केली होती. त्यामुळे नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप आघाडीवर राहण्याची चिन्हे आहेत.

Girish-Mahajan
Maharashtra Politics: नगरपालिका निवडणुकांनी भाजपचा आत्मविश्वास वाढला, महापालिकांसाठी देवा भाऊंचे स्वबळाला प्राधान्य?

सिन्नर, निफाड, येवला, नासिक आणि इगतपुरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदारांना स्वबळावर निवडणुकांच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे या सर्व नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने अन्य पक्षांना बरोबर घेऊन उमेदवार दिले.

जिल्ह्याच्या विविध नगरपालिका निवडणुकीमध्ये अनपेक्षित पणे शिवसेना शिंदे पक्षाने जोर लावला. भगूर, इगतपुरी, नांदगाव, मनमाड, येवला येथे शिवसेना शिंदे पक्षाने पूर्ण जोर लावला होता. त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रसद पुरवली.

सिन्नर, इगतपुरी, ओझर यांस विविध ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने जोर लावला होता. पक्षाच्या नेत्यांनी येथील उमेदवारांना मदत केली. निवडणुकीच्या तोंडावरच शिवसेना शिंदे पक्षाने उद्धव ठाकरे पक्षाच्या अनेक उमेदवारांना आणि नेत्यांना फोडले. शिवसेना ठाकरे पक्ष त्यानंतरही जोमाने लढला हे विशेष.

निवडणुकीच्या सबंध प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी ताकद लावली होती. तिन्ही नेत्यांनी नाशिकमध्ये प्रचार केला. नगरपालिका निवडणुकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी प्रचार करण्याची ही पहिलीच वेळ होती. या आक्रमक धोरणाच्या तुलनेत महाविकास आघाडी प्रचारात कमी पडली. महायुती सरकारचा कारभार आणि नेत्यांचे वस्त्रहरण महायुतीच्या नेत्यांनीच केले. नगरपालिका निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com