Pathardi-Shevgaon BJP : ... म्हणून पाथर्डी-शेवगावात दिवाळीनंतर भाजपमध्ये धमाका होणार!

BJP Politics : 'त्या' घटनेमुळे पाथर्डी-शेवगावमध्ये भाजपतील अंतर्गत धुसफूस प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंना दिसली होती.
bjp
bjpSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar BJP News : पुढील वर्षी आधी लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा पंचवार्षिक निवडणुका असणार आहेत. त्यामुळे 2023 वर्ष संपत असताना पक्षाच्या संभाव्य उमेदवारांबरोबरच इच्छुक उमेदवारांच्या हालचाली सुरू झाल्याचे चित्र अवघ्या महाराष्ट्रात आहे.

याला नगर जिल्ह्यातील पाथर्डी-शेवगाव विधानसभा मतदारसंघही अपवाद नसल्याचे चित्र आहे. विशेष करून भाजपअंतर्गत या दृष्टीने हालचाली दिसून येत असून, एक गट त्यादृष्टीने चांगलाच कामाला लागल्याची चर्चा आहे.

bjp
Ajit Pawar : अजित पवार गटाने अमित शाहांना भेटून केल्या 'या' महत्त्वपूर्ण मागण्या!

पाथर्डी-शेवगाव मतदारसंघात वंजारी समाजाचे मोठे प्राबल्य असून, भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हाच आमचा पक्ष असे मानणारा आहे. त्यामुळे वंजारी समाज गोपीनाथ मुंडेंमुळे नेहमीच भाजपचा पाठीराखा राहिलेला आहे. पूर्वी गोपीनाथ मुंडे आणि आता पंकजा मुंडेंचा निर्णय हा आदेश मानून काम करणारा हा समाज आहे.

नुकत्याच नगर जिल्ह्यात दक्षिण नगर भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी जिल्ह्याची कार्यकारिणी घोषित केली. यात पाथर्डी-शेवगाव तालुक्यातून कार्यकारिणीवर आलेल्या ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड, अरुण मुंडे, वैद्य, बाळासाहेब सोनवणे आदींच्या निवडीला आमदार मोनिका राजळे समर्थकांनी आपल्याला डावलल्याचाआरोप करत तीव्र आक्षेप घेतला. त्यामुळे आमदार राजळे यांचाही नाईलाज झाला आणि जिल्हाध्यक्ष भालसिंग यांनी शेवगाव-पाथर्डीतील पदाधिकाऱ्यांच्या निवडीला स्थगिती दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एकूणच या घडामोडींमुळे दोन्ही गटांनी जिल्हाध्यक्षांसमोर स्वतंत्रपणे शक्ती प्रदर्शन करत एकमेकांच्या गटावर कुरघोडी केली. हा संघर्ष एवढा वाढला की प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मध्यंतरी नगर दौऱ्यावर असताना त्यांच्या समोरच मुंडे समर्थक गोकुळ दौंड, अरुण मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी करत आपल्या गटाची चुणूक दाखवून दिली. यातून भाजपत विशेष करून पाथर्डी-शेवगावमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचा संदेश प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या समोर गेला.

मुंडे समर्थक असणाऱ्या याच गटाने मध्यंतरी पंकजा मुंडे यांचा परळीतून झालेल्या पराभवानंतर पंकजा यांना पक्षाकडून जाणूनबुजून 'साइडलाइन' ठेवल्या जात असल्याची चर्चा पुढे आणून पंकजा यांनी पाथर्डी मतदारसंघातून 2024 ची विधानसभा निवडणूक लढवावी, असा मोठा आग्रह केला होता आणि हा आग्रह आजही कायम आहे. पंकजा मुंडे यांनी मात्र याबाबत स्पष्ट भूमिका सांगितली नसली तरी आपण परळीतूनच निवडणूक लढवणार, असे संकेत दिलेले आहेत.

मात्र, असे असले तरी मुंडे समर्थक गट 2024 ला वेगळी भूमिका घेण्याच्या मानसिकतेत असून, 'आदेशा'ची वाट पाहत आहे. याबाबत पंचायत समितीचे माजी सभापती गोकुळ दौंड यांनी पंकजा मुंडे जो आदेश देतील, त्यानुसार निर्णय घेऊ, असे सांगत 'बंडा'चा झेंडा फडकावत ठेवल्याची भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे. याबाबत दौंड यांनी "सरकारनामा"शी बोलताना मुंडे समर्थक भाजप पक्षाशी एकनिष्ठ असून, पंकजा मुंडे जो आदेश देतील तो मानणारे आहेत असे स्पष्ट केले.

लोकशाहीत जनता ही सर्वश्रेष्ठ असते. त्यामुळे जनतेच्या मनात काय आहे याची जाणीव पक्षाला असते, असे दौंड यांनी सांगताना आपली इच्छा अप्रत्येक्ष व्यक्त केली आहे. तसेच वेळ आल्यावर याबाबत स्पष्ट भूमिका घेऊ, असेही त्यांनी सांगताना जुन्या आणि एकनिष्ठ कार्यकर्त्यांवर पक्ष अन्याय करणार नाही, अशी अपेक्षा बोलून दाखवली आहे.

एकूणच सध्या दिवाळी सणात फटाकड्यांचे बॉम्ब फुटत असले तरी दिवाळीनंतर पाथर्डी-शेवगाव मतदातसंघात राजकीय बॉम्ब फुटणार का याची उत्सुकता नागरिकांत आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com