पंकजा मुंडे नाराज आहेत का? भागवत कराडांनी स्पष्टच सांगितले

केंद्रीय मंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) आज नाशिक दौऱ्यावर होते
Pankaja Munde, Bhagwat Karad
Pankaja Munde, Bhagwat Karadsarkarnama
Published on
Updated on

Bhagwat Karad : नाशिक : भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) नाराज नाहीत, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) यांनी सांगितले. तसेच त्या केंद्रीय पातळीवर काम करत आहेत. त्यामुळे नाराजीचा प्रश्न नाही असे कराड यांनी स्पष्ट केले.

महानुभाव पंथीय साधू व समाजबांधवांच्या अधिवेशनांचा नाशिकमध्ये समारोप झाला. या समारोपाच्या कार्यक्रमाला कराड उपस्थित होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पंकजा मुंडे नाराज आहेत का असा प्रश्न कराड यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी वरील उत्तर दिले. तसेच कालच दिल्लीत त्यांची एक तास भेट झाल्याचेही त्यांनी सांगितले. आमदार नाही, मंत्रिमंडळ स्थान कसे मिळणार? आमदार नाही म्हणून पात्र नाही, असे स्पष्टीकरण मुंडे यांनी दिले असल्याची माहितीही कराड यांनी दिली.

Pankaja Munde, Bhagwat Karad
Shiv Sena : मी शिवसेना बोलते ? देखाव्यावर शिंदे सरकारची कारवाई , मंडळाची न्यायालयात धाव

दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. यावर कराड यांना विचारले असता ते म्हणाले भाजपचे काही नेते राज ठाकरे यांना भेटले. मात्र, काय समीकरण येणार हे माहिती नाही.

महागाईवर बोलताना कराड म्हणाले, देशात कोरोनानंतर अर्थव्यवस्था सुधारत आहे. महागाई आहे, मात्र इतर देशांच्या तुलनेत आपल्याकडे कमी आहे. अमेरिका आणि चीनच्या तुलनेत महागाई कमी असल्याचे कराड यांनी यावेळी सांगितले. आम्ही दोन वेळा डिझेल, पेट्रोलचे दर कमी केले आहे. राज्याचा जीएसटी हे सेसच्या नावाने लावले जात होते. आता सुट्ट्या मालावर जीएसटी लागणार नाही. सुट्या साहित्यावर कोणताही जीएसटी नाही. केवळ पॅकिंग साहित्यावर जीएसटी आहे, असेही ते म्हणाले.

Pankaja Munde, Bhagwat Karad
भाजप-मनसे युतीबाबत अहिरांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात रंगली चर्चा

तसेच त्यांनी गणेशोत्सवाच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत आहे. महाराष्ट्र नाही तर देशभरात गणेशोत्सव साजरा केला जात आहे, असेही त्यांनी सांगितले. राज्यात आता डबल इंजिन सरकार आहे. विकासाला महाविकास आघाडीमुळे ब्रेक लागला होता, असा टोला त्यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com