जयकुमार रावल यांची १९ कोटींची मागणी पुर्ण होईल का?

शिंदखेडा मतदारसंघात पन्नास गावांना तलाठी, दहा गावांना मंडळ अधिकारी कार्यालयांची प्रतीक्षा
Jaykumar Rawal
Jaykumar RawalSarkarnama
Published on
Updated on

धुळे : शिंदखेडा (Dhule) तालुक्यात दहा गावांत स्वतंत्र मंडळ अधिकारी कार्यालये, तर तब्बल ५० गावांत स्वतंत्र तलाठी कार्यालये नाहीत. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल (Jaykumar Rawal) यांनी १९ कोटी रुपये निधीची गरज असल्याचे नमूद करत हा निधी मंजूर करावा, अशी मागणी महसूलमंत्री (Revenue) राधाकृष्ण विखे-पाटील (Dr. Radhakrishna Vikhe Patil) यांच्याकडे केली आहे. Will revenue minister Fullfill BJP leader Rawal`s expectations)

Jaykumar Rawal
`राष्ट्रवादी`च्या राजेंद्र भोसले यांनी घडवला इतिहास!

मतदारसंघातील दहा गावांतील मंडळ अधिकारी कार्यालये व निवासस्थाने तसेच ५० गावांत स्वतंत्र तलाठी कार्यालयांच्या बांधकामासाठी या निधीची मागणी त्यांनी केली आहे. आता विखे पाटील त्यांची मागणी पूर्ण करणार का याची उत्सुकता आहे.

Jaykumar Rawal
MNS Raj Thackeray Confused : गोंधळलेले ठाकरे मनसेला कसं निवडून आणणार ?

शिंदखेडा तालुक्यातील मंडळ अधिकारी व तलाठी यांची कार्यालये नाहीत. ग्रामपंचायत अथवा खासगी जागेत ही कार्यालये सुरू आहेत. त्यांची स्वतंत्र कार्यालये गरजेची आहेत, जेणेकरून तलाठी वेळेवर जनतेला उपलब्ध होतील. त्यामुळे प्रत्येक सजाच्या ठिकाणी कार्यालय बांधण्यासाठी प्रस्ताव सादर केला असून, त्याला मंजुरी द्यावी, अशी मागणी आमदार रावल यांनी केली.

मंडळ अधिकारी कार्यालये येथे हवीत

शिंदखेडा, दोंडाईचा, चिमठाणे, वर्शी, विरदेल, खलाणे, नरडाणा, बेटावद, विखरण, शेवाळे या ठिकाणी मंडळ अधिकारी कार्यालय बांधकामासाठी तीन कोटी ९९ लाख रुपये निधीची मागणी आमदार रावल यांनी केली आहे.

या गावांना तलाठी कार्यालये

मालपूर, रामी, टाकरखेडा, निमगूळ, झोटवाडे, कुरकवाडे, बाह्मणे, कोडदे, खर्दे बुद्रुक, दाऊळ, हातनूर, कर्ले, देगाव मेथी, दिवी, दभाषी, होळ, वायपूर, चिरणे, महाळपूर, वालखेडा, अजंदे बुद्रुक, पढावद, मुडावद, म्हळसर, अमळथे, लोहगाव, तामथरे, दराणे, सवाई मुकटी, डांगुर्णे, पाटण, वरपाडे, वरसूस, वरूळ, भडणे, आरावे, कंचनपूर, वाघाडी, वारूड, गोराणे, कमखेडा, जातोडे, पाष्टे, चिलाणे, रंजाणे, चौगाव बुद्रुक, सुकवद, दत्ताणे व डाबली-धांदरणे अशा ५० गावांना तलाठी कार्यालयांची मागणी करण्यात आली आहे. या कार्यालयांच्या बांधकामासाठी प्रत्येकी ३० लाख रुपये याप्रमाणे १५ कोटी रुपये निधीची आवश्यकता असून, हा निधी मंजूर करावा, अशी मागणी आमदार रावल यांनी महसूलमंत्री विखे-पाटील यांच्याकडे केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com