NCP Vs BJP: भाजपला दे धक्का; पाथर्डीत वायकरांच्या NCP प्रवेशामुळे ढाकणेंची ताकद वाढली...

Ahmednagar Political News : गणेश वायकर यांचा शेकडो समर्थकांसह प्रवेश
NCP Vs BJP Ahmednagar Political News
NCP Vs BJP Ahmednagar Political News Sarkarnama
Published on
Updated on

Nagar: पाथर्डीतील माळीबाभूळगाव येथील ग्रामपंचायत सदस्य गणेश वायकर यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये अँड.प्रतापराव ढाकणे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

अँड. ढाकणे यांच्या निवासस्थानी हा प्रवेशाचा कार्यक्रम झाला. वायकर हे पूर्वी राष्ट्रवादीत होते. परंतु त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता पुन्हा ते राष्ट्रवादी परतले आहे. गणेश वायकर यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे ढाकणे यांची माळीबाभूळगावात ताकद वाढली आहे.

अॅड.प्रतापराव ढाकणे म्हणाले, "वायकर व त्यांचे समर्थक गेल्या काही दिवसांपासून अतिशय अस्वस्थ दिसत होते. याला मूळ कारण म्हणजे तरुणांच्या हाताला काम नाही. दिवसेंदिवस राज्य आणि देशातील बेरोजगारी वाढत आहे. सरकार मात्र देखावा व भूलभुलैय्याचे वातावरण तयार करून तरुणांना त्यांच्या मूलभूत प्रश्नांपासून लक्ष विचलित कसे होईल यासाठी अधिक प्रयत्नशील आहे. संपूर्ण देशात जात, पंथ आणि धर्म या मुद्द्यावर आजच्या तरुणाईला लक्ष केंदीरित करण्यासाठी वेगळीच शक्ती कार्यरत आहे. आज देशावर लाखो कोटी रुपयांचे कर्ज झाले आहे".

तरुण मुले-मुली सुशिक्षित असूनही धडपडत आहेत. सरकारच्या ज्या विभागाच्या परीक्षा झाल्या त्यांचे निकाल आजही लागायला तयार नाहीत. मागील साडेनऊ वर्षात भारतातील बेरोजगारीचा उच्चांक सर्वाधिक आहे. आपण समाजातील जबाबदार युवक आहात तुमच्या माध्यमातून तुमच्या इतर सहकाऱ्यांचेही तुम्ही प्रबोधन करून योग्य वाटचाल करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करावे, असे आवाहन ढाकणे यांनी शेवटी केले.

NCP Vs BJP Ahmednagar Political News
NCP News: BJP नेत्यांवर ED कारवाई दाखवा, 1 लाखाचे बक्षिस जिंका! NCPकडून बॅनरबाजी

गणेश वायकर यांनी पुढील काळात अँड. प्रतापराव ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली पाथर्डी तालुक्यात युवकांचे संघटन करून सध्याची राजकीय वस्तूस्थिती त्यांच्यापुढे मांडत आपण काम करणार आहोत, असे सांगितले. यावेळी राहुल वायकर,अक्षय वायकर, किरण दिवटे, रशीद शेख,निलेश वायकर,भारत भोईटे, देविदास काळे, शौकत शेख, जलाल शेख, सुनील कोलते उपस्थित होते.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com