Lahu Kanade And Girish Mahajan : आमदार कानडे भाजप नेते महाजनांच्या स्वागताला; काँग्रेस श्रेष्ठींनी डोळे वटारले?

Lahu Kande BJP meeting with Girish Mahajan sparks political discussions : काँग्रेस आमदार लहू कानडे यांनी भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेत सत्कार केल्याने श्रीरामपूरमध्ये राजकीय उलथापालथीचे चर्चेने जोर धरला आहे.
Lahu Kanade And Girish Mahajan
Lahu Kanade And Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : काँग्रेस आणि भाजपमधील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. दोघा पक्षांतील नेतृत्वामध्ये कधी कोणत्या मुद्यांवरून भडका उडेल, याचा नेम नाही. दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांपासून काहीसे सावधच वागतात.

मात्र श्रीरामपूर मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार लहू कानडे यांची त्यांच्याच पक्षातील निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या युवा पदाधिकाऱ्यांकडून कोंडीमुळे गोंधळून गेलेत. यातच त्यांनी भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतल्याने त्यांची काँग्रेसमधील राजकीय कोंडी अधिक गडद झाली आहे.

विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यातील राजकीय उलथापालथींना वेग आला आहे. तिकीट मिळवण्यापासून ते जिंकून येण्यापर्यंत राजकीय गणितांची जुळवाजुळवी करण्यात इच्छुक गुंतले आहेत. यातून स्वपक्षासह इतर राजकीय पक्षांकडे चाचपणी करताना दिसत आहेत. काँग्रेसचे श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे सध्या वेगळ्याच मूडमध्ये दिसत आहेत.

अहमदनगरच्या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार कानडे काँग्रेसकडून प्रतिनिधीत्व करतात. ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचे ते कट्टर समर्थक आहेत. विधानसभा निवडणूक जशी जवळ येऊ लागली आहे, तशी त्यांची पक्षातील इच्छुक युवा पदाधिकाऱ्यांकडून कोंडी होऊ लागली आहे. त्यामुळे ते अस्वस्थ आहेत. ही कोंडी फोडण्यासाठी ते वरिष्ठ नेत्यांकडे फिल्डिंग लावून असून, श्रीरामपूरमध्ये काँग्रेसकडून मीच पुन्हा असेल, असा दावा करत आहेत.

यातच भाजप (BJP) नेते मंत्री गिरीश महाजन काल श्रीरामपूर दौऱ्यावर आले होते. भाजप पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. यावेळी आमदार लहू कानडे त्यांच्या स्वागतासाठी पोचले. पुष्पगुच्छ देऊन त्यांनी त्यांचे स्वागत केले. भाजप नेत्याचे काँग्रेस आमदारांकडून असे स्वागत झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहेत.

विशेष म्हणजे, आमदार लहू कानडे यांनी ज्या टायमिंगला भाजपचे नेत्याचे स्वागत केले, त्यातून वेगळाच अर्थ निघू लागला आहे. लहू कानडे यांची पक्षातील झालेल्या कोंडीनंतर त्यांनी भाजप नेत्याचा केलेला सत्कार काँग्रेस कार्यकर्त्यांना रुचलेला नाही. त्यामुळे त्याचा पडसाद आगामी काळात उमटण्याची शक्यता आहे. लहू कानडे यांचे टायमिंग चुकले, असेही देखील छुपी चर्चा आता सुरू झाली आहे.

मतदारसंघात राज्यमंत्री आल्याने मी माझ्या मतदारसंघात लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या स्वागतासाठी गेलो होतो, अशी प्रतिक्रिया आमदार लहू कानडे यांनी देत वेळ मारून नेली. सत्कारापलीकडे आमच्या दोघांमध्ये काहीच झाले नसल्याचे सांगत असले, तरी काँग्रेसमधील नेत्यांना हा सत्कार खटकल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

आमदार कानडेंची युवक नेत्यांकडून कोंडी

आमदार लहू कानडे यांना काँग्रेसचे युवा पदाधिकारी हेमंत ओगले वारंवार आव्हान देत आहे. श्रीरामपूर मतदारसंघात त्यांनी काँग्रेसकडून उमेदवारीसाठी शड्डू ठोकला आहे. हेमंत ओगले यांना श्रीरामपूरमधील युवा नेते करण ससाणे यांचा पाठिंबा मिळाला आहे. यातून या जोडगोळीने श्रीरामपूर मतदारसंघात संवाद यात्रा सुरू केली आहे. संवाद यात्रेतून मतदारांपर्यंत पोचत आहेत. यातून जस जसे जनमत तयार होत आहे, तसा हेमंत ओगले काँग्रेसकडे उमेदवाराची दावा मजबूत करत आहेत.

आमदार लहू कानडे यांनी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांची देखील भेट घेतली होती. परंतु भानुदास मुरकुटे यांची अशोक सहकारी साखर कारखान्यात करण ससाणे यांच्या गटाशी युती आहे. त्यामुळे लहू कानडे यांना मुरकुटे यांच्या भेटीत हाताला काहीच लागले नाही. यातून आमदार लहू कानडे यांची अस्वस्थता वाढली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com