Girish Mahajan: 'नार-पार' वरुन गिरीश महाजन- उन्मेष पाटील यांच्यात आरपारची लढाई

Girish Mahajan on Unmesh Patil Protested Nar Par Girna River linking project : "सरकारकडून गिरणा नार-पार योजनेचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, तरीही हा प्रकल्प होणार नाही, यादृष्टीने गैरसमज पसरविला जात आहे. हा प्रकार केवळ ‘नौटंकी’चा भाग आहे,"
Girish Mahajan on Unmesh Patil
Girish Mahajan on Unmesh PatilSarkarnama
Published on
Updated on

जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला (Nar-Par-Girna Interlinking Project) सरकारने मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प सुरु होण्यापूर्वीच उत्तर महाराष्ट्रात राजकारण रंगले आहे.

माजी खासदार उन्मेष पाटील यांनी गिरणा नार-पार प्रकल्पावरून गिरणा नदी पात्रात उतरून आंदोलन केलं. भाजपतचे नेते, मंत्री गिरीश महाजन यांनी उन्मेष पाटलांना टोला लगावला आहे. गिरीश महाजन यांनी माजी खासदार उन्मेष पाटील यांना चिमटा काढला आहे.

ते म्हणाले, "सरकारकडून गिरणा नार-पार योजनेचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, तरीही हा प्रकल्प होणार नाही, यादृष्टीने गैरसमज पसरविला जात आहे. त्याचाच भाग म्हणून गिरणा नदीत जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे. हा प्रकार केवळ ‘नौटंकी’चा भाग आहे,"

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज जळगाव येथे दौरा आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी महाजन जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी ते जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलत होते.

Girish Mahajan on Unmesh Patil
Waqf Amendment Bill: मुस्लिम समाजाच्या उद्धव ठाकरेंकडून अपेक्षा वाढल्या, ठाकरे गटाची नेमकी भूमिका काय?

आंदोलकांचं नार-पार योजनेसाठी गिरणा नदीपात्रात अर्धनग्न होऊन जलसमाधी आंदोलन सुरू करण्यात आले. जळगावच्या चाळीसगांव तालुक्यातील गिरणा नदीपात्रात हे आंदोलन केले. ठाकरे गटाचे नेते उन्मेष पाटील हे स्वत: सहभागी झाले आहेत. ते स्वत: नदीत उतरले होते. २८ तासानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

नार-पार-गिरणा नदी खोर्‍यातून 10.64 टीएमसी पाण्याचा वापर होणार आहे. यामुळे तब्बल 49 हजार 516 हेक्टर क्षेत्राला फायदा होणार आहे. नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

नार-पार-गिरणा या नदीखोऱ्यातून 10.64 TMC पाणीवापर प्रस्तावित आहे. आता या योजनेला मंजूर मिळाल्याने उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

असा आहे नार-पार-गिरणा नदीजोड

  • नार-पार या नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा तालुक्यांतील नद्यांचे वाया जाणारे पाणी गिरणा नदीत टाकण्याची ही योजना आहे. यासाठी साडेसहा ते सात हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे.अडीच लाख हेक्टर सिंचनक्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे.

  • नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, देवळा, मालेगाव या तालुक्यांना, तर जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, धरणगाव, अमळनेर, धरणगाव आदी तालुक्यांतील सिंचनक्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे. धुळे जिल्ह्यातील काही भागांत याचा लाभ होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com