नाशिक : पोलिसांनी (Police) एखाद्या व्यक्तीला अटक केली असेल तर त्याचे नातेवाईक किंवा वकिल त्याला भेटायला जातात. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit sommaiya) राणा दाम्पत्याला भेटायला पोलिस ठाण्यात गेले होते. राणा दाम्पत्याचे (Rana Family) ते नेमके कोण आहेत, हे कळले नाही, असा टोला राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील (Deelip valse patil) यांना सोमय्या यांना लगावला आहे.
महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या प्रशिक्षणार्थींच्या ११९ व्या तुकडीचे दीक्षांत संचलन सोहळ्यासाठी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील येथे आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री छगन भुजबळ आदी मंत्री उपस्थित होते. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. वळसे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
गृहमंत्री वळसे पाटील यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या कृतीबाबत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, भाजप नेते सोमय्या यांनी राणा दाम्पत्याला भेटण्यासाठी पोलिस ठाण्यात जाण्याची गरज नव्हती. अटकेत असलेल्या व्यक्तीला भेटायला नातेवाईक किंवा वकील जायला पाहिजे.
ते पुढे म्हणाले, राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा किंवा अस्थिर करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो आहे. मात्र पोलिस ही परिस्थिती नियंत्रणात ठेवतील यात शंका नाही. पोलिसांची राणा दाम्पत्यावर कालची कारवाई ही, पोलिसांच्या माहितीनुसार आहे.
गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून विरोधक सातत्याने सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातून आता राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रयत्न होतं आहे. पण, ते शक्य होणार नाही. सध्याच्या सर्व प्रकरणात नियमाप्रमाणे कारवाई होईल.
केंद्राची सुरक्षा का देता?
ते म्हणाले, सध्या दिसताना असं चित्र दिसत की, राज्याच्या विरोधात बोलणाऱ्यांना केंद्र सुरक्षा देते. काहींना झेड सुरक्षा का दिली हे कळत नाही. त्यांना धोका कसला? याचा विचार करायची वेळ आली आहे. राणा दाम्पत्य प्रकरणात कुणाचा तरी हात आहे. त्याशिवाय ते धाडस करू शकत नाही. त्याचा पोलिस सखोल तपास करीत आहेत. यासंदर्भात उद्या विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक आहे. त्या बैठकीस मनसेप्रमुख राज ठाकरे यांची सभा आणि भोंगे प्रकरणी चर्चा होईल. त्याचे निमंत्रण मनसे अध्यक्षांनाही दिले आहे.
ते म्हणाले, पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये राजी, नाराजी असतेच. ठाण्यातील बदल्यांचा त्याअनुषंगाने फेरविचार करावासा वाटल्याने स्थगिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घराबाहेरील हल्ल्याचे इनपुट पोलिसांकडे होते. मात्र, समन्वयात अडचणी आल्या. त्यात दोषी असलेल्यावर निलंबनाची कारवाई झालेली आहे.
...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.