Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe PatilSarkarnama

Radhakrishna Vikhe Patil: मंत्री विखे थोरातांना का म्हणाले मौनीबाबा...

Lok Sabha Election 2024: भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालणे हा समाजाचा विश्वासघात आहे. लाखो ठेवीदार वाऱ्यावर सोडले आहेत व उत्तरेतील माजी मंत्री मौनीबाबाच्या भूमिकेत आहेत. खरे तर लोकांनी त्यांच्याकडे पाहून त्या संस्थेत पैसे गुंतवले होते. त्यामुळे आता ते परत देण्याची गॅरंटी त्यांनीच घेतली पाहिजे, अशी मागणी मंत्री विखे यांनी केली.

Ahmednagar: नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe Patil) यांनी संपदा पतसंस्थेत घोटाळ्यामागे राजाश्रय कोणी दिला? असा प्रश्न करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचे नाव न घेता कोंडी केली. मंत्री विखे यांनी ठेवीदारांना बुडवणाऱ्याबद्दल उत्तरेतील माजी मंत्री मौनीबाबा का झाले आहेत? असा सवालदेखील केला.

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर भाजपच्या संकल्पपत्र मुद्द्यांची माहिती मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, शिंदे सेनेचे संपर्कप्रमुख बाबूशेठ टायरवाले, धनंजय जाधव, निखिल वारे, अशोक गायकवाड, आनंदा शेळके उपस्थित होते. संपदा पतसंस्थेच्या ज्ञानदेव वाफारेसह पाच जणांना न्यायालयाने जन्मठेप शिक्षा दिली, यावर बोलताना मंत्री विखे यांनी माजी मंत्री आमदार थोरात यांच्यावर जोरदार टीका केली.

विखे म्हणाले, "संपदा बुडवणाऱ्यांना राजाश्रय कोणी दिला? तो तुरुंगातून बाहेर आल्यावर त्याला गाडीत घेऊन कोण फिरत होते? त्यामुळे संपदातील दोषींना झालेल्या शिक्षेबद्दल त्यांना राजाश्रय देणाऱ्यांनी भाष्य केले पाहिजे. त्यांच्या गळ्यातील तो तारणहार होता. आता मी नाही त्यातली.., अशी भूमिका ते घेत आहेत. खरे काय आहे ते लोक विसरणार नाहीत". प्रति मंत्री म्हणून तो वावरत होता. भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालणे हा समाजाचा विश्वासघात आहे. लाखो ठेवीदार वाऱ्यावर सोडले आहेत व उत्तरेतील माजी मंत्री मौनीबाबाच्या भूमिकेत आहेत. खरे तर लोकांनी त्यांच्याकडे पाहून त्या संस्थेत पैसे गुंतवले होते. त्यामुळे आता ते परत देण्याची गॅरंटी त्यांनीच घेतली पाहिजे, अशी मागणी मंत्री विखे यांनी केली.

पतसंस्था व आर्थिक संस्था संचालकांच्या उन्मादामुळे आणि मनमानीमुळे अडचणीत आल्यावर ठेवीदारांच्या पैशांचे भविष्य काय, असा प्रश्न निर्माण होतो. मात्र यापुढे पतसंस्थांची मॉर्गेज प्रॉपर्टी आणि राखीव निधी बँकांना देऊन त्यातून उभे राहणारे पैसे ठेवीदारांना देण्याबाबत विचार सुरू असून निवडणुकीनंतर यासाठी सरकारकडे प्रस्ताव करण्याचा प्रयत्न आहे. संस्था बुडवणाऱ्या संचालकांवर पोलीस कारवाई होईल. परंतु ठेवीदारांचे हीत जपले पाहिजे, असेही मंत्री विखे यांनी स्पष्ट केले.

Radhakrishna Vikhe Patil
Navneet Rana News: 'मोदींची हवा..., या फुग्यात कोणी राहू नका'; राणांची थेट मोदींवरच टीका

रावसाहेब पटवर्धन संस्था जरी प्रवरा संस्थेने घेतली असली तरी त्या संस्थेच्या ठेवी इकडे वर्ग झालेल्या नाहीत. कर्जाची वसुली केली गेली आहे आणि पूर्वीच्या संचालकांमुळे संस्था अडचणीत आल्याने त्यांच्यावर कारवाई सुरू आहे, अशी माहितीही विखे यांनी दिली.

पवार विखेंविरोधात सभा घेणार नाही, असे होणार नाही. विखेंविरुद्ध प्रचार करण्यास ज्येष्ठ नेते शरद पवार आले नाहीत, असे होणारच नाही. नगर जिल्ह्यात त्यांनी आमच्याविरुद्ध सभा घेतली नाही तर ते दहावे आश्चर्य ठरेल, असे उपरोधीक भाष्य मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले. महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले, "त्यांच्याकडे फार लक्ष द्यायची गरज नाही. कोणाला कोठे उभे राहायचे व कोणाचे नेतृत्व मानायचे याचे स्वातंत्र्य आहे. जनता उघड्या डोळ्याने पाहत आहे. जे स्वतःच्या नेत्याचे होऊ शकले नाहीत, ते जनतेचे कसे होणार, असा खरा प्रश्न आहे".

Edited by: Mangesh Mahale

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com