Padmakar Valvi: 'एकनाथ शिंदे हे मूर्ख, नालायक मुख्यमंत्री'; माजी मंत्र्यांचं बेताल वक्तव्य

Padmakar Valvi on CM Eknath Shinde: आदिवासी आमदार, खासदारांनी राजीनामा देण्याची गरज नाही. राजीनामा देण्याची सरकारला फक्त धमकी द्या," असा सल्ला वळवी यांनी आंदोलनाला उपस्थित असलेल्या आमदार, खासदारांना दिला.
CM Eknath Shinde
CM Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

सागर निकवाडे

काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये आलेले माजी मंत्री पद्माकर वळवी (Padmakar Valvi)यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका करताना वळवी यांची जीभ घसरली. ते नंदुरबारमध्ये धनगर आरक्षण मुद्दांवर बोलत होते. "एकनाथ शिंदे हा मूर्ख नालायक मुख्यमंत्री आहे," अशा शब्दात वळवी यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलताना तोंडसूख घेतले.

धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून नंदुरबारमध्ये आदिवासी समाज आक्रमक झाला आहे. "जे सरकार किंवा पक्ष आदिवासींच्या विरोधात निर्णय घेईल त्याला जमिनीत गाडल्या शिवाय शांत बसायचं नाही. आदिवासी आमदार, खासदारांनी राजीनामा देण्याची गरज नाही. राजीनामा देण्याची सरकारला फक्त धमकी द्या," असा सल्ला वळवी यांनी आंदोलनाला उपस्थित असलेल्या आमदार, खासदारांना दिला.

CM Eknath Shinde
Naigaon Assembly: मराठवाड्यातील 'या' जागेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये रस्सीखेच सुरु

"आदिवासी आमदार, खासदार यांनी राजीनामा देण्याची धमकी देण्याबरोबरच भाजप आणि शिवसेना पक्षाची उमेदवारी न करण्याचे आवाहन वळवी यांनी यावेळी केले. आदिवासींच्या हक्कासाठी आमदारांनी राजीनामा देऊ नका, तर सरकारमधील तिन्ही पक्षाकडून उमेदवारी करू नका," असे वळवी म्हणाले. आदिवासी क्षेत्रातून शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपाला हद्दपार करा, असे आवाहन त्यांनी केले.

ऐन लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) तोंडावर नंदुरबारचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मोदींच्या विकास कामावर प्रभावित होऊन आपण भाजपामध्ये प्रवेश करत असल्याचं पद्माकर वळवी यांनी सांगितलंय.

पद्माकर वळवी हे १९९९ ते २०१४ या कालावधीत तळोदा आणि शहादा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले होते. २००९ ते २०१४ या काळात पद्माकर वळवी हे राज्य मंत्रिमंडळात मंत्री होते.

नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पद्माकर वळवी यांनी काम पाहिले आहे. ते राज्याचे क्रीडामंत्रीदेखील होते. पद्माकर वळवी यांची मुलगी काँग्रेसमध्ये सक्रिय असून त्या नंदुरबार जिल्हा परिषदमध्ये वर्चस्व असणाऱ्या नेत्यांपैकी एक आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील राजकारणात वळवी कुटुंबीयांचे वर्चस्व आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com