Mumbai News : "सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्याजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याची घटना दुर्दैवी आहे. परंतु यावरून विरोधकांनी बेभान, असं राजकारण सुरू केले आहे. ही त्यांची दिवाळखोरी आहे. यातून महाराष्ट्राच्या अस्मितेला तडे जात आहे", असा शब्दात विरोधकांवर भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे बरसले.
भाजप (BJP) नेते मंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नौदलानं उभारला होता. पुतळा कोसळल्यानंतर त्याची चौकशी नौदलाकडून सुरू झाली आहे. हा पुतळा उभारताना काय निकष लावले होते, त्याची पडताळणी होणार आहे. नौदलावर तुमचा विश्वास आहे की नाही? असा सवाल देखील मंत्री विखे यांनी केला". ही घटना गंभीर आणि दुर्दैवी आहे. परंतु त्याचे राजकारण करणे चुकीचे आहे. कोणत्या मुद्यावर राजकारण करायचे आणि कोणत्या नाही, हे विरोधकांना समजत नसेल, तर राज्याच्या दृष्टीने दुर्दैव आहे, असे मंत्री विखे यांनी म्हटले.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यात शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. महाविकास आघाडीचे नेते आज राजकोट किल्ल्यावर पुतळा कोसळलेल्याची पाहणी करण्यासाठी गेले होते. तिथे देखील राणे-ठाकरे (Aditya Thackeray) समर्थकांमध्ये राडा झाला. त्यामुळे पुतळा कोसळण्याच्या प्रकरणावरून संतापाची लाट उसळली आहे. विरोधकांच्या आक्रमकतेला सत्ताधारी भाजपकडून देखील संयमाने प्रत्युत्तर दिले जात आहे. मंत्री विखे भाजपमधील वरिष्ठ नेते आहे. त्यांनी विरोधकांच्या राजकारणाला बेभान असे म्हणत फटकारले आहे.
बदलापूर घटना गंभीर आहे. राज्य सरकारचे घटनेशी निगडीत प्रत्येक बाबींवर लक्ष आहे. राज्यातील प्रत्येक शाळांमध्ये आता सीसीटीव्ही बसवले जात आहेत. शाळांना तशा सूचना आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील सर्व संस्थाचालकांची बैठक घेऊन सीसीटीव्ही बसवण्याच्या सूचना केल्या जाणार आहेत. जिल्हाधिकारी यांना तसा आदेश दिला आहे, असे राधाकृष्ण विखे यांनी सांगितले.
अहमदनगर-मनमाड रस्त्याचं दुरुस्तीचे काम सुरू होणार असून, त्यासाठी रस्ता 15 दिवस बंद करण्यात येणार आहे. या महामार्गावरील अवजड वाहतूक 15 दिवसांसाठी अन्य मार्गाने वळवण्यात येईल. 15 सप्टेंबर नंतर कामाचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याची माहिती मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.