साक्री : साक्री (Dhule) तालुक्यात तीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर दरम्यान तीन दिवसात अतिवृष्टी (Heavy rainfall) झाली. त्याचा फटका तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना (Farmers) व रहिवाशांना बसला आहे. नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा करत ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रांतिक सदस्य तथा ज्येष्ठ नेते सुरेश पाटील (Suresh Patil) यांनी केली. तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांना शुक्रवारी निवेदन देण्यात आले. (BJP leaders meet tahsildar for inquest of rainfall affect)
निवेदनात म्हटले आहे, की गुरुवारी पहाटे चारपासून सुमारे सहा ते सात तास तालुक्यात अतिमुसळधार पाऊस झाल्याने नदी - नाल्यांना पूर आला. तालुक्यात ६५ मिलीपर्यंत पाऊस झाल्याची नोंद आहे. नदी काठावरील शेतामध्ये पाणी शिरल्याने आणि संततधार पावसामुळे प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतातील पिके सडण्याच्या मार्गावर आहेत.
अतिवृष्टीमुळे अनेक गावांतील घरांची पडझड झालेली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचे भांडवल टाकून पेरा केला आहे. संपूर्ण पिके खराब झाली आहेत. शिवाय अतिपावसामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. यामुळे खरीप उत्पादनात मोठा फटाका बसणार आहे.
तालुका अतिवृष्टीग्रस्त जाहीर करत ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी ज्येष्ठ नेते सुरेश पाटील यांनी केली आहे. या प्रसंगी, अशोक सोनवणे, रमेश भामरे, रावसाहेब सोनवणे, चंद्रकांत खैरनार, गोटू देसले, देवराव भामरे उपस्थित होते.
---
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.