जाता जाता भाजप नेत्यांचा नगरसेवकांवर पैशांचा पाऊस!

प्रशासनाच्या अंदाजपत्रकात स्थायीकडून ३४० कोटींची वाढ
Corporators happy
Corporators happySarkarnama

नाशिक : महापालिका (NMC) निवडणुकीची आचारसंहिता कुठल्याही क्षणी लागण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून २०२२-२३ आर्थिक वर्षासाठी स्थायी समितीला (Nashik BJP) सादर करण्यात आलेल्या दोन हजार २२७ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकात ३३९, ९७ कोटींची वाढ करण्यात आली आहे. स्थायी समितीच्या अंदाजपत्रकात विकासकामांसाठी २७२ कोटी रुपयांची तरतूद करताना नगरसेवकांच्या प्रभाग विकासनिधी (Funds) पन्नास लाखांपर्यंत पोचविण्यात आला आहे.

Corporators happy
शिवसेनेनेच्या निवडणुक कोअर कमिटीत विलास शिंदे, विनायक पांडेंची नियुक्ती

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात २०२२-२३ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर करण्यात आले. उत्पन्नाच्या बाजूचा विचार करून दोन हजार २२७ कोटींचे प्रारूप अंदाजपत्रक सादर करण्यात आले. प्रशासनाच्या अंदाजपत्रकात नवीन विकासकामांसाठी ८५. ९८ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यामुळे स्थायी समितीने नगरसेवकांची पडती बाजू लक्षात घेऊन ३३९. ०७ कोटी रुपयांच्या कामांची अतिरिक्त भर घातली आहे. ३३९. ९७ लाखांच्या वाढीमुळे अंदाजपत्रक आता २५६७ कोटींपर्यंत पोचले आहे.

Corporators happy
अडीच कोटींचा निधी परत गेल्याने कृषी सभापतींचे अधिकाऱ्यांविरुद्ध बंड

प्रशासनाने १३३ नगरसेवकांसाठी प्रत्येकी तीस लाख रुपये प्रमाणे ४१. ४० कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यात स्थायी समितीने वीस लाख रुपयांची वाढ करताना नगरसेवकांसाठी प्रभाग विकासनिधी पन्नास लाखांपर्यंत पोचविण्यात आला असून, एकूण ६९ कोटी रुपयांची तरतूद आहे. तीन नगरसेवकांच्या एका प्रभागासाठी दीड कोटी रुपयांचा प्रभाग विकासनिधी उपलब्ध होईल. खर्चाप्रमाणेच उत्पन्न वाढीच्या बाजूंमध्ये ३४० कोटी रुपयांची वाढ सुचविण्यात आली. प्रशासनाने भूखंड बीओटीवर विकसित झाल्यास दोनशे कोटी रुपयांचे उत्पन्न ग्राह्य धरले. त्यात स्थायी समितीने १८७ कोटी रुपयांची वाढ करताना ‘बीओटी’ मधून ३८७ कोटी रुपये उत्पन्न ग्राह्य धरले. नगररचना विभागाकडून प्राप्त होणाऱ्या विकास शुल्कात ६३ कोटी, अतिरिक्त एफएसआय विक्रीतून ४२. ५१ कोटी रुपये, अनधिकृत बांधकाम अधिकृत करण्यासाठी ३८. ७६ कोटी रुपये प्राप्त होतील, असा अंदाज बांधण्यात आला आहे.

नवा उड्डाणपूल प्रस्तावित

कॉलनी अंतर्गत रस्ते, नवीन वसाहतींमध्ये खडीकरण, खडीकरण झालेल्या रस्त्यांवर अस्तरीकरण, आडगाव येथील आयटी हबकडे जाण्यासाठी रस्ते यासाठी तरतूद करण्यात आली आहे. दिंडोरी रोडवर तारवालानगर जवळ नव्याने उड्डाणपूल तयार केला जाणार आहे. सिंहस्थ भूसंपादनासाठी पन्नास कोटी रुपये, मायको सर्कल व त्रिमूर्ती चौकातील वादग्रस्त उड्डाणपुलांसाठी १०४ कोटी रुपये, नमामि गोदा प्रकल्पांतर्गत मुख्य मलवाहिका दुरुस्तीसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. स्थायी समितीचे अंदाजपत्रक महासभेला सादर केले जाणार आहे.

----

नगरसेवक व प्रभाग विकास निधीमध्ये वाढ करण्यात आली आहे. खर्चात वाढ झाली असली तरी उत्पन्नाची बाजू गृहीत धरून उत्पन्न वाढीसाठीदेखील योजना आखण्यात आली आहे.

- गणेश गिते, सभापती, स्थायी समिती.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com