Shanaishwar Devasthan Trust : 'शनैश्वर देवस्थान'चे विश्वस्त मंडळ बरखास्त; तक्रारदारांचा फटाके फोडून जल्लोष अन् शनिदेवाला अभिषेक

BJP Mahayuti Govt Dissolves Shanaishwar Devasthan Trust Board in Newasa Ahilyanagar : विविध घोटाळ्यांनी चर्चेत असतानाच, नेवाशातील शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आले.
Shanaishwar Devasthan Trust 1
Shanaishwar Devasthan Trust 1Sarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar Shanaishwar Devasthan news : कर्मचारी भरतीमधील अनियमितता, कोट्यवधी रुपयांचा ऑनलाईन अ‍ॅप घोटाळा अन् आर्थिक घोटाळ्याचे मुद्दे चर्चेत असताना काल सोमवारी रात्री उशिरा शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आले.

उपविधी सल्लागार व उपसचिव सागर ज. बेंद्रे यांची सही असलेला सरकारचा निर्णय महाराष्ट्र सरकारच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाला. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.

राज्य सरकारच्या संकेतस्थळावर काल रात्री अपलोड करण्यात आलेल्या पत्रावर देवस्थान प्रशासनात अनियमितता, बनावट ऑनलाईन अ‍ॅप घोटाळा, आर्थिक गैरव्यवहार, हिंदू (Hindu) व मुस्लिम कर्मचाऱ्यात वैमनस्य परिस्थिती, उपकार्यकारी अधिकारी आत्महत्या आदी गंभीर घटनेने भाविकांचा विश्वास डळमळीत झाला असल्याने येथील कारभारात सुसूत्रता व पारदर्शकता येण्यासाठी निर्णय घेण्यात आल्याचे नमूद केले आहे.

सरकार निर्णय या मथळ्याखाली सरकारने अधिनियम सन 2018मध्ये केलेल्या अधिनियमातील कलम 5च्या उपकलम (1) अन्वये शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे व्यवस्थापन आता नव्याने ‘श्री शनैश्वर देवस्थान विश्वस्त व्यवस्था व्यवस्थापन समिती’ अशी तरतूद केल्याचे नमूद केले आहे. अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी यांची प्रशासक म्हणून तात्पुरती नियुक्ती केल्याचे सरकार निर्णयात म्हटले आहे.

Shanaishwar Devasthan Trust 1
Top 10 News: इतका नालायक, हरामखोर, बदमाश माणूस सोलापुरात सापडत नव्हता ते अजितदादांच्या पाठोपाठ आता शिंदेंची शिवसेनाही नागपुरात ‘डिक्लेरेशन' देणार

काही दिवसांनी नवीन समिती गठीत केल्यानंतर प्रशासक हे पद आपोआप रद्द होईल, असा उल्लेख असून महाराष्ट्राचे (Maharashtra) राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने सरकार निर्णय प्रसिद्ध करीत असल्याचे पत्रात म्हटले आहे.

Shanaishwar Devasthan Trust 1
Shani Shingnapur Scam: राज्य सरकारचा शनैश्वर देवस्थानबाबत सर्वात मोठा निर्णय; अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवली 'ही' जबाबदारी

दरम्यान दोन महिन्यापूर्वी ऑनलाईन पुजा साहित्य अ‍ॅप घोटाळा चर्चेत आल्यानंतर विश्वस्त मंडळाने कुठलीच कारवाई केली नसल्याने नेवासा आमदार विठ्ठल लंघे अन् आमदार सुरेश धस यांनी विधानसभा अधिवेशनात लक्षवेधी मांडून शनैश्वर देवस्थान विश्वस्तांच्या कारभारावर ताशेरे ओढले होते. 11 जुलै 2025 लक्षवेधीला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेथे 258 कर्मचाऱ्यांची गरज आहे, तिथे 2 हजार 447 अनावश्यक कर्मचारी भरती केल्याचे सांगत विश्वस्तांवर लवकरच फौजदारी दाखल करणार असल्याचा इशारा दिला होता.

फटाके फोडून जल्लोष

तक्रारदार ऋषिकेश शेटे व युवकांनी काल रात्री गावात फटाके फोडले. यानंतर शनिदेवाला अभिषेक घातला. ‘न्यायदेवतेने योग्य न्याय दिला’ व ‘शनैश्वर महाराज की जय’ अशा घोषणा चौथऱ्यावर उभा राहून दिल्या.

मुंबई धर्मादाय कार्यालयात सुनावणी

शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भागवत बानकर यांनी प्रशासनास काल रात्री नऊ वाजेपर्यंत विश्वस्त मंडळ बरखास्त झाल्याचा कुठलाही मेल आलेला नाही. मुंबई धर्मादाय आयुक्त कार्यालयात उद्या बुधवारी (ता. 24) म्हणणे मांडण्याची तारीख असून देवस्थानचे विश्वस्त व वकील तारखेस हजर होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com