Rahul Aher news; चांदवडमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीने भाजपला थकवले

सौंदाणे सरपंचपदाच्या निवडणुकीत युवासेनेचे चेतन पवार यांचा एकतर्फी विजय
Dr Rahul Aher & Shirish Kotwal
Dr Rahul Aher & Shirish KotwalSarkarnama

चांदवड : (Nashik) तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का देत नवीन युवा चेहऱ्यांनी बाजी मारली. काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागले आहेत. भाजपने (BJP) १९ सरपंच निवडून आल्याचा दावा केला आहे. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनेही (Congress) १६ सरपंच आमचे निवडून आल्याचा दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आठ सरपंच निवडून आल्याचा दावा कार्यकर्ते करीत आहेत. शिवसेना (ठाकरे गट) दोन जागा तर शिवसेना (शिंदे गट) एकही जागा मिळालेली नाही. (Mahavikas front ahead in Chandwad taluka Grampanchayat)

Dr Rahul Aher & Shirish Kotwal
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा डिवचलं; म्हणाले, ''महाराष्ट्राला इंचभरही जमीन..!''

चांदवड तालुक्यात भाजपचे विद्यमान आमदार डॅा. राहुल आहेर आणि काँग्रेस नेते शिरीष कोतवाल यांच्यात राजकारण विभागलेले आहे. त्यात सहकार व अन्य सत्ताकेंद्रांत काँग्रेसचे कोतवाल यांची आघाडी असते. ग्रामपंचायत निवडणुकीत हे दोन्ही गट अतिशय ताकदीने उतरले होते. त्यात काँग्रेसने भाजपला थकवले. काँग्रेसचे आव्हान स्विकारत भाजपनेही चांगले यश मिळवले.

Dr Rahul Aher & Shirish Kotwal
Gujrat Politics : आम आदमी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना गुजरात पोलिसांकडून अटक

वडाळीभोईच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख नितीन आहेर हे विजयी झाले आहेत. शिंगवे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पॅनल उभे न करता फक्त सरपंचपदासाठी निवडणूक लढवून भाजपचे आत्माराम खताळ यांनी विजयश्री खेचून आणत सर्वांनाच धक्का दिला. निमोण ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत भाजपच्या डॉ. स्वाती देवरे या निवडून आल्या.

डोणगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का देत काँग्रेसचे गोकूळ वाघ थेट सरपंचपदी निवडून आले. आडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बाजार समितीचे माजी संचालक निवृत्ती घुले यांच्या पत्नी लताबाई घुले विजयी झाल्या. खडक ओझरच्या सरपंचपदी सागर पगार हे विजयी झाले आहेत. कुंदलगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राजेंद्र गिडगे यांच्याच गटाची सत्ता आली.

काही गावात संपूर्ण पॅनल निवडून आले तर काही ठिकाणी मतदारांनी संमिश्र कौल दिला.

सरपंचपदी विजयी उमेदवार असे

शेलू- अमोल जाधव, निंबाळे- रविना सोनवणे, चिंचोले- पवन जाधव, दहेगाव- कमळाबाई पगारे, कोकणखेडे- संदीप शिंदे, डोणगाव- गोकूळ वाघ, मालसाणे- पुष्पा बोरगुडे, वाद - प्रवीण आहेर, काजीसांगवी- कल्पना ठाकरे, साळसाणे- अनिल ठाकरे, शिंगवे- आत्माराम खताळ, खडकओझर- सागर पगार, सोनेसांगवी- अलका ठाकरे, कुंदलगाव- कविता मोरे, नारायणगाव- सुरेखा सोनवणे, मेसनखेडे खु - संतोष माळी, आडगाव- लताबाई घुले, पाटे कोलटेक- रंगनाथ सूर्यवंशी, चिखलअंबे - शोभा लांडगे, भाटगाव- हिराबाई पगार, खेलदरी- मालती जाधव, रेडगाव खु - यादव गरुड, विटावे- साईनाथ कोल्हे, पुरी- रंजनाबाई पानसरे, गणुर- बाळू सोनवणे, तळवाडे- संदीप जाधव, बोराळे- बाकेराव जाधव, दुधखेडे- दिलीप हाडस, भुत्याणे- छाया चिंचोले, देवरगाव- ज्ञानेश्वर शिंदे, निमोण- स्वाती देवरे, दरेगाव- सरला पवार, दुगाव- संजय सोनवणे, तळेगाव रोही- भाऊसाहेब जिरे, वडाळीभोई- नितीन आहेर.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com