Kangana Ranaut Shani temple : राज ठाकरेंची कन्या अन् खासदार कंगना एकत्र शनिदेवाच्या दर्शनाला; तेलाभिषेक करून काय साकडं घातलं?

Kangana Ranaut and Raj Thackeray Daughter Urvashi Visit Shanishingnapur Temple in Ahilyanagar : भाजप खासदार कंगना रनौत यांनी अहिल्यानगर दौऱ्यावर येत, शनिशिंगणापूर इथं शनिदर्शन घेत तेलाभिषेक घातला.
Kangana Ranaut Shani temple
Kangana Ranaut Shani templeSarkarnama
Published on
Updated on

BJP MP Kangana Ranaut temple darshan : राज ठाकरे यांची कन्या उर्वशी ठाकरे आणि भाजप खासदार कंगना रनौत यांनी शिर्डी इथं साईसमाधीचं दर्शनापाठोपाठ शनिशिंगणापूर इथं येत शनिदर्शन घेतलं.

खासदार रनौत आणि राज ठाकरे यांची कन्या एकत्र देवदर्शनाला आल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं. महाविकास आघाडी काळात कंगना रनौत यांनी उद्धव ठाकरे सरकारला चांगलेच टार्गेट केलं होतं. त्यामुळे स्मृतीत गेलेल्या अनेक राजकीय आठवणी ताज्या झाल्या आहेत.

खासदार कंगना रनौत (Kangana Ranaut) यांनी शिर्डी इथं साईसमाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर शनिशिंगणापूर इथं येत शनिदर्शन घेतलं. यावेळी कंगना यांनी शनिदेवाला तेलाभिषेख घातलं. कंगना रनौत यांच्याबरोबर राज ठाकरे यांची कन्या उर्वशी होती. त्यामुळे वेगळ्याच चर्चांना उधाण आलं आहे.

खूप दिवसापासून शनिदर्शन घेण्याची इच्छा होती. पूर्ण विश्वात असं मंदिर नसून शनिची चांगली दृष्टी राहावी, यासाठी प्रार्थना केल्याचं कंगना राणावत त्यांनी म्हटलं. शिर्डीतील (Shirdi) साई मंदिर आणि नेवाशातील शनिशिंगणापूर देवस्थानच्यावतीने रनौत आणि उर्वशी ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला.

Kangana Ranaut Shani temple
Top 10 News : सत्तेच्या दहीहंडीसाठी शक्तिप्रदर्शन, कृषी विद्यापीठावर राज्याबाहेरील कुलगुरू? मुलींची छेड काढणाऱ्यांवर अजितदादा संतापले; वाचा Top-Ten राजकीय घडामोडी...

राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार असताना, कंगना रनौत यांचं कधीच पटलं नाही. उद्धव ठाकरेंच्या सरकारशी कंगना रनौत यांनी एकप्रकारे 'पंगा'च घेतला होता. अभिनेता सुशांत राजपूत याच्या निधनापासून त्याला न्याय मिळवून देण्याची भाषा कंगना वापरत होत्या. यानंतर मुंबई महापालिकेकडून कंगना यांच्या कार्यालयावर आणि त्यानंतर घरावर अतिक्रमणाची कारवाई झाली.

Kangana Ranaut Shani temple
Vice Chancellor selection dispute : राहुरी कृषी विद्यापीठावर राज्याबाहेरील कुलगुरू? निवड प्रक्रिया वादात सापडण्याची चिन्हं

कट्टर मोदी समर्थक असलेल्या कंगना यांनी उद्धव ठाकरे यांना व्यक्तिगत टार्गेट केलं. कंगनाचे हल्ले तीव्र होते. यातून वाद विकोपाला गेले. यातून चर्चेत आलेल्या कंगना रनौत यांना भाजपने हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. कंगना या निवडणुकीत जिंकून देखील आला. यानंतर लोकसभेच्या कामकाजाला देखील त्या हजेरी लावत आहे.

परंतु दोन्ही ठाकरे बंधूंची युती होत असतानाच, कंगना रनौत आणि राज ठाकरे यांची कन्या उर्वशी एकत्र आल्या आहेत. या दोघी एकत्र देवदर्शन घेत आहे. शिर्डी आणि शनिशिंगणापूर इथं देवदर्शनाला हजेरी लावली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com