BJP Politics : राज्यभरातील शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकट कोसळले आहे. दुसरीकडे विमा कंपन्यांनी भरपाई देण्यात टाळाटाळ केल्याने राज्य सरकारविरोधात टीकेची झोड उठवली जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी थेट केंद्रीय मंत्र्यांकडे याबाबत हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. (Banana Producers of Jalgaon refuses claims from insurance companies)
जळगावच्या (Jalgaon) खासदार खडसे (Raksha Khadse) यांनी यासंदर्भात केंद्रीय कृषीमंत्र्यांकडे तक्रार निवारण समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे. केळी उत्पादकांमध्ये या प्रश्नावर मोठी नाराजी असल्याने शासनावर त्याचा मोठा राजकीय दबाव निर्माण झाला आहे.
‘फळपीक विमा योजना आंबिया बहार- 2022’मध्ये विमा उतरविलेल्या जवळजवळ 75 हजार शेतकऱ्यांच्या शेताचा सॅटेलाइट यंत्रणेद्वारे सर्व्हे केला असता, एकूण 10 हजार 619 शेतकऱ्यांनी विमा कालावधीत कोणतेही पीक लागवड केले नसल्याचे, विमा कंपनीच्या निदर्शनास आले असून, त्यांना विमा लाभ नाकारला.
या विषयावर जळगाव जिल्ह्यातील राजकीय पक्षांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. शेतकऱ्यांत याबाबत नाराजी निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने याबाबत नुकताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी याबाबत जिल्ह्यातील मंत्री तसेच राज्य सरकारला दोषी धरले होते. शेतकऱ्यांनी देखील मोठ्या प्रमाणात या मोर्चात सहभाग घेतला होता. त्यामुळे भाजपच्या खासदार, लोकप्रतिनिधी या विषयावर सक्रिय झाले आहेत.
यासंदर्भात शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. खासदार खडसे यांनी विविध शेतकऱ्यांच्या शेतात पाहणी केली असता, केळीचे पीक आढळले. विम्याचा लाभ नाकारलेल्या या दहा हजार 619 शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळाला पाहिजे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती गठीत करण्यात यावी, अशी मागणी खासदार खडसे यांनी केंद्रीय कृषिमंत्री तोमर याच्याकडे केली.
शेतकऱ्यांच्या तक्रारींचे तत्काळ निवारण होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती गठीत करण्यात यावी, अशी मागणी खासदार खडसे यांनी केली. याबाबत त्यांनी दिल्ली येथे कृषिमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली. या वेळी केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी व शोभा करंदलाजे बैठकीस उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.