Lok Sabha Election 2024 : 'नगर जिल्ह्यातही 'रामराज्य' येणार...'; राम शिंदे अन् लंकेंनी वाढवली सुजय विखेंची धडधड

Ram Shinde, Nilesh Lanke On MP Sujay Vikhe : 'मी डॉक्टर नाही, पण वेळ आली तर राजकीय शस्त्रक्रिया करू शकतो,' आमदार लंकेंचा खासदार विखेंना अप्रत्यक्ष टोला
Ram Shinde and Nilesh Lanke
Ram Shinde and Nilesh LankeSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagr News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येमध्ये रामलल्लाची प्रतिष्ठापना झाली, यामुळे देशात रामराज्य आले आहे. अशाच पद्धतीने नगर जिल्ह्यातही आता 'रामराज्य' येणार आहे, असे सूचक भाष्य जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व भाजपचे विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांनी प्रजासत्ताकदिनी पारनेर तालुक्यातील कोरठण खंडोबा येथे केले.

दरम्यान, कोविडकाळात केलेल्या उल्लेखनीय कामामुळे फ्रान्सच्या विद्यापीठाने मला डॉक्टरेट दिली आहे. तसा मी डॉक्टर नाही, पण वेळ आली तर राजकीय शस्त्रक्रिया करू शकतो, असे पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी यावेळी सूचकपणे स्पष्ट केल्याने जिल्ह्यात तो चर्चेचा विषय झाला आहे. (Lok Sabha Election 2024 In Ahmednagr Politics)

लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. नगर दक्षिण जिल्ह्यातून भाजपचे विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांची उमेदवारी निश्चित असल्याची धारणा त्यांच्या समर्थकांची आहे. मात्र, विधान परिषदेचे भाजपचे आमदार प्रा. राम शिंदे यांनीही खासदारकी लढवण्याची इच्छा पक्षाकडे व्यक्त केली आहे, तर दुसरीकडे महायुती सरकारमधील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे पारनेरचे आमदार नीलेश लंके व त्यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्या राणी लंके यांनीही पक्षश्रेष्ठींनी आदेश दिला तर खासदारकी लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर प्रजासत्ताकदिनी (शुक्रवारी, 26 जानेवारी) प्रा. शिंदे व आमदार लंके कोरठण खंडोबा येथील यात्रा उत्सवात एकत्र होते. त्यामुळे साहजिकच राजकीय चर्चांना उधाण आले व त्यात सूचक राजकीय भाष्य करीत शिंदे व लंके यांनी भर टाकल्याने राज्यभरात हा चर्चेचा विषय झाला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ram Shinde and Nilesh Lanke
Vikhe Patil On Ajit Pawar: मंत्री विखेंनी वाढवली अजितदादांची धडधड; 70 हजार कोटींच्या घोटाळ्यावर...

नगरच्या लोकसभा क्षेत्रात रामाची लहर येणार : शिंदे

कोरठण येथे माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले, मी व आमदार लंके सर्वसामान्य माणसे आहोत. ग्रामीण भागात राहणारे आहोत. आमचे पक्ष जरी वेगळे असले तरी महायुतीत आम्ही एकाच सरकारमध्ये काम करीत आहोत. आमची आधीपासून मैत्री आहे. मात्र, आम्ही एकत्र आलो तर चर्चा होते व अशी चर्चा झाली पाहिजे. आम्ही दोघांनी आज खंडोबारायाचे दर्शन घेतले व सदानंदाचा यळकोट म्हणत जागर केला. देवाची आरती केली व तळीही उचलली, असे स्पष्ट करून ते म्हणाले, अयोध्येत श्रीराममूर्तीची पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते प्रतिष्ठापना झाल्यावर देशात रामराज्य आले आहे व आता नगरच्या लोकसभा क्षेत्रात रामलल्लाची लहर पसरली आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यात नक्कीच 'रामराज्य' येणार आहे, असे सूचकपणे त्यांनी स्पष्ट केले.

नगर जिल्ह्यातही 'रामराज्य' यावं : लंके

आमदार लंके म्हणाले, आम्ही दोघेही सर्वसामान्य कुटुंबातील आहोत. एकमेकांविषयी आत्मीयता व प्रेम आहे. मोहटादेवीला जाताना योगायोगाने मी आमदार शिंदे यांच्या गाडीचा चालक म्हणजे सारथी झालो व आता देशात रामराज्य आले असल्याने नगर जिल्ह्यातही 'रामराज्य' यावे व त्या रामराज्याचा मी सारथी असावे, अशी प्रार्थना खंडेरायाकडे केली आहे. माझ्या राजकीय जीवनातील अडचणीच्या वेळी शिंदे यांनी मला मदत केली, असेही आमदार लंके यांनी आवर्जून स्पष्ट केले. मला डॉक्टरेट मिळाल्यावर अन्य कुणाला डॉक्टरेट वा अन्य काही मिळाले, त्याबद्दल मला बोलायचे नाही. मी डॉक्टर झालो तरी ऑपरेशन करू शकणार नाही. मात्र, वेळ आली तर राजकीय शस्त्रक्रिया मला करता येईल, असेही आमदार लंके यांनी स्पष्ट केले.

बैल-गाडा शर्यतीला हजेरी

कोरठण खंडोबा यात्रेनिमित्त खंडोबा मंदिराच्या पाठीमागे असलेल्या घाटात शुक्रवारी उत्साहात बैलगाडा शर्यती रंगल्या. आमदार शिंदे व आमदार लंके यांनी या शर्यतींच्या वेळी हजेरी लावून बैलजोड्या घेऊन शर्यतीत सहभागी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले व शर्यतींचा आनंद लुटला. त्यानंतर त्यांनी खंडोबा मंदिरात येऊन दर्शन घेतले. यावेळी कोरठण खंडोबा देवस्थानच्या अध्यक्षा शालिनीताई घुले, सचिव जालिंदर खोसे, उपाध्यक्ष महेश शिरोळे, तसेच विश्वस्त मंडळ सदस्य कमलेश घुले, सुवर्णाताई घाडगे, सुरेश फापाळे, चंद्रभान ठुबे, अ‍ॅड. पांडुरंग गायकवाड, रामदास मुळे आदी उपस्थित होते.

'आमचीच जोडी घाटाचा राजा'

यावेळी बोलताना आमदार लंके यांनी बैलगाडा शर्यतीचा किस्सा सांगितला. या शर्यतीत विविध बैलजोड्या गाड्याला जोडल्या गेल्या होत्या. मात्र, त्यापैकी कुणालाही यश मिळाले नाही. मात्र, मी व आमदार शिंदे यांनी ज्या गाड्याला बैलजोडी जुंपली, ती जोडी गाड्यासह इतकी जोमात पळाली, की अवघ्या 11 सेकंदांत ती घाटाचा राजा ठरली, असे ते म्हणताच जोरदार हास्यकल्लोळ उडाला.

(Edited By-Ganesh Thombare)

R...

Ram Shinde and Nilesh Lanke
Nagar Ncp Melava:'...आता अजितदादांना मुख्यमंत्री करू', विखे-पाटील गट सावध!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com