MP Sujay Vikhe Patil News: कोविड सेंटरच्या पैशातून बंगले बांधले त्याचे काय? विखेंचा राऊतांना टोला

Sujay Vikhe Vs Sanjay Raut: भाजपचे खासदार सुजय विखे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या नेत्यांचे सर्वच काही काढले
MP Sujay Vikhe Patil News
MP Sujay Vikhe Patil NewsSarkarnama
Published on
Updated on

Nagar : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मुंबई येथे झालेल्या अधिवेशनात पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना निवडणूक काळात महागडी घड्याळे, पेहराव करू नका, अशा सल्ल्यावरून हल्लाबोल चढवलाय. यावर भाजपचे नगरचे खासदार सुजय विखे यांनी प्रतिहल्ला चढवला आहे.

"त्यांच्या पक्षाचे नेते किती कोटीच्या वाहनांमध्ये फिरतात. हेलिकॉप्टर वापरतात, ते पैसे कुठून येतात. याचे उत्तर त्यांनी पण दिले पाहिजे. कोविड सेंटरच्या पैशातून बंगले बांधले त्याचे काय?", अशा शब्दांत खासदार विखेंनी सुनावले. (BJP MP Sujay Vikhe Latest News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खासदार संजय राऊतांनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना भाजपच्या कुटील नीतीवर जोरदार हल्ला चढवला. भाजपचे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी निवडणुकीला सामोरे जाताना नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी कसे सामोरे जायला पाहिजे यावर भाष्य केले. यावर राऊतांनी भाजपचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते वापरत असलेली महागडी घड्याळे, वाहने, पेहराव यावर जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी वापरत असलेल्या लाखो रुपयांच्या पेहरावरदेखील भाष्य केले. यासंदर्भात सुजय विखेंनी राऊतांच्या पक्षाच्या नेत्यांचे सर्वच काही काढले.

MP Sujay Vikhe Patil News
East Central Railway Bharti 2024: रेल्वेत खेळाडूंना नोकरीची संधी; ऑफलाइन पद्धतीने अर्ज करा

खासदार विखे म्हणाले, "यांचे नेते कोट्यवधीच्या गाडीमध्ये फिरतात. हेलिकॉप्टरमध्ये फिरत असताना तो पैसा कुठून येतो हेदेखील पाहिले पाहिजे. भाजपचे पक्षाध्यक्ष नड्डा यांनी सुचवलेल्या जीवनशैलीचा वेगळा अर्थ कोणी काढू नये. हे राऊतांना समजणार नाही. ते त्यांना समजण्याच्या पलीकडचे आहे". यांचे नेते कमाईचे कोणतेही साधन नसताना कोविड सेंटरच्या पैशातून आज गाड्या आणि बंगले घेतले आहेत. त्यांच्या त्या पक्षाच्या नेत्याच्या टीकेला काय उत्तर द्यायचे? आणि त्यांनी अशी टीका करणेदेखील योग्य वाटत नाही, असेदेखील खासदार विखे यांनी म्हटले.

दरम्यान, एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट निवडणुकीनंतर भाजप सोडून देईल, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. यावर सुजय विखे म्हटले, "त्यांना असं वाटते की, जसं आपण करतो तसेच समोरच्यांनी वागले पाहिजे. पण ते तसं नाही, राजकारणामध्ये प्रत्येक व्यक्ती हा वेगळा असतो. तुमच्या नेत्यांनी पन्नास वर्षांमध्ये लोक वापरायचे, सोडून द्यायचे. त्यांना विचारायचे नाही, असे काम केले. हे भारतीय जनता पक्षामध्ये होत नाही". भारतीय जनता पक्षामध्ये जो काम करेल, जो नेता वेगवेगळ्या भूमिका पक्षासाठी साकारेल आणि सहकार्य करेल, त्याला पक्ष कधीच विसरत नाही. प्रत्येकाला न्याय देण्याचे काम भाजप करत आहे. राज्यसभा आणि विधान परिषदेच्या उमेदवारीवरून हे सर्वश्रुत झाले आहे. त्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. पक्षाने संघटनेमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक नेत्याला कुठे ना कुठेतरी न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, असे खासदार विखे यांनी म्हटले आहे.

R

MP Sujay Vikhe Patil News
Congress 65 crore : खात्यातून 65 कोटी कापताच काँग्रेस नेते भडकले; ' हा तर मोदी सरकारचा आर्थिक दहशतवाद...'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com