Nashik BJP Politics : नाशिकच्या भाजप कार्यकर्त्यांवर गुजरातच्या कार्यकर्त्यांचा वॉच

Nashik BJP Politics For Assembly Election 2024 : भाजपने विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. नाशिक जिल्ह्यात गुजरातमधून विशेष पथक येणार आहे. या पथकातील कार्यकर्ते सांगतील त्याप्रमाणेच स्थानिक भाजप कार्यकर्त्यांना काम करावे लागणार आहे.
BJP Politics
BJP PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Nashik News 30 August : भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपच्या मदतीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असतोच. मात्र, यंदा संघ अधिक सक्रिय होणार आहे.

भाजपच्या केंद्रीय समितीने महाराष्ट्राच्या निवडणुकीवर विशेष लक्ष केंद्रीत केलं आहे. त्या अनुषंगाने गुरुवारी पक्षाचे केंद्रीय संघटन मंत्री शिवप्रकाश यांच्या उपस्थितित बैठक घेण्यात आली. यावेळी लोकसभा निवडणुकीत भाजप (BJP) राज्यघटना बदलणार, असे नरेटिव्ह विरोधकांनी तयार केले होते.

लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) विरोधी पक्षांनी सेट केलेले नरेटिव्ह खोडून काढण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची टीम आणि सामाजिक समरसता मंच यांच्याकडून केले जाणार आहे. त्यासाठी संविधान रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली येत्या 4 सप्टेंबरला नाशिकच्या काळाराम मंदिरात येईल. यावेळी कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या निवडणुकीवर भाजपचे विशेष लक्ष असेल. त्यासाठी गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) यांच्या विश्वासातील गुजरातचे कार्यकर्ते सक्रिय होणार आहेत. महाराष्ट्र जिंकण्यासाठी यंदा भाजपच्या मदतीला गुजरातची ही स्पेशल टीम असणार आहे.

आमदार रत्नाकर हे नाशिकच्या सर्व 15 मतदारसंघांचा खास आढावा घेणार आहेत. त्याबाबतचा अहवाल ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देतील. त्यानंतर उमेदवाराची निवड आणि निवडणुकीच्या प्रचाराची दिशा ठरविली जाणार आहे.

BJP Politics
Chhatrapati Shivaji Maharaj statue : 'पळून पळून कुठे जाणार'; असं अजित पवार का म्हणाले?

नाशिक (Nashik) शहरासाठी गुजरातचे 100 कार्यकर्ते स्थानिक कार्यकर्त्यांसमवेत मतदारांचा अंदाज घेतील. येत्या 4 सप्टेंबरला हे कार्यकर्ते नाशिकमध्ये दाखल होतील. याशिवाय आणखी तीनशे कार्यकर्ते जिल्ह्यातील अन्य मतदारसंघांमध्ये जाऊन काम करणार आहेत.

गुजरातची ही टीम विशेष प्रशिक्षित असल्याचा दावा केला जातो. त्यामुळे निवडणूक जिंकण्याचे कौशल्य या टीमकडे आहे. भारतीय जनता पक्ष यंदा गुजरातच्या या खास टीमच्या मदतीने महाराष्ट्र जिंकणार आहे. त्यासाठी भाजपने जोरदार काम सुरू केले आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात भाजप आणि त्याच्या मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित संघटनांही सहभागी केले जाणार आहे.

सध्या नाशिक जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे पाच आमदार आहेत. येथे निवडणुकीत सुमारे सात मतदारसंघात भाजप निवडणूक लढविणार आहे. उर्वरित आठ मतदारसंघांमध्ये महायुतीचे सहकारी पक्ष शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार असतील.

BJP Politics
Maha Vikas Aghadi News : काँग्रेस म्हणतंय 80-85, ठाकरे गटाची वाढली काळजी!

ही निवडणूक महायुतीने अतिशय प्रतिष्ठेची केली आहे. या निवडणुकीच्या परिणाम आगामी गुजरात व अन्य निवडणुकांवर होणार आहेत. त्यामुळे पक्षाची यंत्रणा अतिशय जागरूकपणे काम करीत आहे. याबाबत लोकसभा निवडणुकीत केलेल्या कामकाजाचा आढावा आणि त्यातील उणिवा लक्षात घेतल्या जाणार आहेत.

याबाबत गुजरातचे कार्यकर्ते महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांना दिशादर्शन करतील. त्यानुसार स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम करायचे आहे. गुजरातच्या टीमच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक पदाधिकाऱ्यांनी काम करायचे आहे, त्यात कोणत्याही तक्रारी आल्यास पक्षाकडून त्याची गंभीर दखल घेतली जाणार आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. त्या दृष्टीने महायुती सरकारने विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण यावर जोर दिला आहे. आगामी काळात लाडकी बहीण योजना आणि राज्य सरकारच्या योजनांच्या प्रचारावर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. दलित वस्त्यांमध्ये जाऊन सामाजिक समरसता मंच काम करणार आहे. त्याचा किती उपयोग होतो हे आगामी काळात स्पष्ट होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com