Chandrashekhar Bawankule : हजारोंच्या उपस्थितीत भाजपच्या बावनकुळे यांना खडे बोल!

BJP Politic : केरसाणे (सटाणा) येथे हजारोंच्या जनसामुदायात कीर्तनकारांनी भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना कांदा निर्यात बंदीवर सुनावले
Chandrashekhar Bawankule : हजारोंच्या उपस्थितीत भाजपच्या बावनकुळे यांना खडे बोल!
Published on
Updated on

Nashik News: भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना काल हजारोंच्या उपस्थितीत कांदा आणि मराठा आरक्षणाच्या विषयावर खडे बोल ऐकावे लागले. यावेळी भाजपच्या उपस्थित नेत्यांची चांगलीच नामुष्की झाली.

केरसाणे (सटाणा) येथे दरवर्षी फिरत्या नारळाचा कार्यक्रम होतो. या कार्यक्रमाला हजारो वारकरी आणि नागरिकांची हजेरी असते. यंदाही तेवढ्याच उत्साहात हा कार्यक्रम सुरू असून आळंदीचे कृष्णाजी माऊली महाराज यांचे कीर्तन झाले. या कीर्तनात हजारोंचा जनसामुदाय असल्याने ओघानेच विविध राजकीय नेत्यांनी देखील हजेरी लावली यामध्ये भाजपचे खासदार सुभाष भामरे, प्रताप दिघावकर आणि अन्य नेते उपस्थित होते.

Chandrashekhar Bawankule : हजारोंच्या उपस्थितीत भाजपच्या बावनकुळे यांना खडे बोल!
Saroj Ahire Vs Rajashri Ahirrao : दोघींचा सवतासुभा त्यात गिरीश महाजनांचा वेगळाच दावा...

कृष्णाजी माऊली यांचा कीर्तनाचा कार्यक्रम सुरू असतानाच या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule) आणि संघटक विजय चौधरी यांचे आगमन झाले. या दोन्ही नेत्यांच्या आगमन हा वादाचा विषय ठरला. हे नेते आल्यावर त्यांचा सत्कार करण्यासाठी काहींची चुळबुळ सुरू झाली.

उपस्थितांच्या हे लक्षात आल्यावर अनेकांनी त्याबाबत उघड नापसंती व्यक्त केली. काही नागरिक उभे राहिले आणि आपण भाजप नेत्यांचा सत्कार करणार असल्यास आम्ही कीर्तन न ऐकता निघून जाऊ अशी भूमिका घेतली. त्यावर वाद मिटवण्यासाठी काही जाणत्या लोकांनी पुढाकार घेत शांतता प्रस्थापित केली. त्यानंतर कीर्तन पुढे सुरू झाले. मात्र, भाजप नेत्यांच्या उपस्थितीने उपस्थितांमध्ये अस्वस्थता कायम असल्याचे जाणवले.

किर्तन सुरू झाल्यावर कीर्तनकार आळंदीचे छोटे माऊली अशी ख्याती असलेले कृष्णाजी माऊली महाराज यांनी विविध विषयांवर नागरिकांचे प्रबोधन केले. यावेळी त्यांनी भाजपचे बावनकुळे यांना आपल्या सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न दुर्लक्षित होत आहे. त्यामुळे समाजात नाराजी पसरली आहे त्याचा हा परिपाक असल्याचे बोलून दाखवले.

हजारोंच्या उपस्थितीत जाहीरपणे बावनकुळे यांना भाजप सरकारच्या निर्णयाबाबत नापसंती व्यक्त करणारे वक्तव्य ऐकावे लागले. तो सबंध जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला. ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली विशेषता सोशल मीडियावर त्याची चांगलीच चर्चा आहे.

Edited By : Rashmi Mane

Chandrashekhar Bawankule : हजारोंच्या उपस्थितीत भाजपच्या बावनकुळे यांना खडे बोल!
Chandrashekhar Bawankule : 'धर्मावरून राजकारण करणाऱ्यांना त्यांचे...' : बावनकुळेंचं वक्तव्य!

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com