Congress politics: काँग्रेसने भाजपच्या अनुराग ठाकूर यांना ठणकावले, सगळेच काढले...

BJP Politics, Anurag Thakur issue, Congress criticized Thakur and BJP On Cast base census-अनुराग ठाकूर यांनी भारताच्या महान समाज सुधारक आणि महापुरुषांचा अपमान केल्याचा काँग्रेसचा आरोप
Rahul Gandhi & Anurag Thakur
Rahul Gandhi & Anurag ThakurSarkarnama
Published on
Updated on

BJP Vs Congress News: भाजप नेते अनुराग ठाकूर यांनी देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबाबत अवमानकारक विधान केले. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी अनुराग ठाकूर यांच्या प्रतिमेला जोडे मारत तीव्र निषेध केला. यावेळी नेत्यांनी भाजप आणि श्री. ठाकूर यांचे सर्वच काढले.

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जात निहाय जनगणना करण्याची मागणी संसदेत केली होती. त्यावर भाजपचे ठाकूर यांनी अतिशय अवमानकारक आणि आपल्या प्रतिगामी विचारसरणीचे प्रदर्शन करणारे वक्तव्य केले होते. त्याचा देशभर निषेध होत आहे.

धुळे येथे त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी ठाकूर यांच्या प्रतिमेला जोडे मारत भाजपच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

सर्वसामान्य नागरिक आणि उपेक्षित घटकांना न्याय आणि विकासाची संधी मिळावी, ही काँग्रेसची भूमिका आहे. विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी त्यासाठी जातनिहाय जनगणना व्हावी अशी भूमिका घेतली आहे. देशातील विविध समाज सुधारक आणि पुरोगामी नेत्यांनी हाच विचार मांडला आहे

Rahul Gandhi & Anurag Thakur
Ajit Pawar : 'मी शब्द फिरवत नाही, एकतर शब्द देत नाही आणि दिला तर...'; अजितदादांचा शेतकरी अन् महिलांना वादा

भाजप हा मुळातच पुराणमतवादी विचारांचा पक्ष आहे. त्याचा जात निहाय जनगणनेला विरोध आहे. त्यातून देशाला भाजपची उक्ती आणि कृती काय आहे, याचा संदेश गेला आहे. मनुवादी आणि सामंतवादी विचारसरणी डोक्यात भरलेल्या भाजपच्या ठाकूर यांनी त्यामुळेच विरोधी पक्ष नेते गांधी यांच्या विषयी अभद्र टिप्पणी केली.

भारतीय जनता पक्षाला गोरगरीब जनता, उपेक्षित घटक आणि मागासलेल्या लोकांचे कल्याण नको आहे. त्यांना मुठभर लोकांसाठी देशातील सत्ता राबवायची आहे. यावर श्री. ठाकूर यांच्या वक्तव्याने शिक्कामोर्तब झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील समाज माध्यमांवर ठाकूर यांचे कौतुक केल्याने त्यांचेही विचार देशाला कळले.

हा सर्व घटनाक्रम भाजपचे सध्याचे सरकार देशाला कोणत्या दिशेने जात आहे, हे स्पष्ट करते. काँग्रेस पक्ष कोणत्याही स्थितीत भाजपचे हे विचार प्रत्यक्षात येऊ देणार नाही. असा इशारा यावेळी देण्यात आला. भाजप विरोधात आक्रमक झालेल्या पदाधिकारी आणि नेत्यांनी यावेळी भारतीय जनता पक्षाने माफी मागावी अशी मागणी केली.

Rahul Gandhi & Anurag Thakur
Ajit Pawar Politics: आमचं ठरलंय, भुजबळ आज माझ्याबरोबर नाहीत, कारण...

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष भा. ई. नगराळे, जिल्हा अध्यक्ष शाम सनेर, माजी खासदार बापू चौरे, प्रदेश सरचिटणीस युवराज करणकाळ, शहराध्यक्ष डॉ अनिल भामरे, महिला आघाडीच्या गायत्री जयस्वाल, ज्येष्ठ नेते रमेश श्रीखंडे, भगवान गरदे, पितांबर महाले यांचा मोठ्या संख्येने पदाधिकारी निषेध आंदोलनात सहभागी झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com