Ajit Pawar Politics: आमचं ठरलंय, भुजबळ आज माझ्याबरोबर नाहीत, कारण...

Ajit Pawar politics: Chhagan Bhujbal not involve in Ajit Pawar's Kalwan tour- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नाशिकच्या दौऱ्यात मंत्री छगन भुजबळ आज सहभागी झाले नाही.
Ajit Pawar & Chhagan Bhujbal
Ajit Pawar & Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजपासून विधानसभा निवडणुकीचा दौरा सुरू केला. आज त्यांचा नाशिकमध्ये कार्यक्रम आहे. मात्र या कार्यक्रमात जिल्ह्याचे नेते छगन भुजबळ त्यांच्या दौऱ्यात सहभागी झाले नाही.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचार दौऱ्याची आज सुरुवात केली. त्यांचा पहिला कार्यक्रम आमदार नितीन पवार यांच्या कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघात आहे. या वेळी मंत्री छगन भुजबळ नाशिक मध्ये असूनही उपमुख्यमंत्री पवार यांच्या दौऱ्यात सहभागी होऊ शकले नाही. श्री. भुजबळ यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ते येवला विधानसभा मतदारसंघात गेले आहेत. मात्र या बातम्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दौऱ्याची चांगलीच चर्चा झाली.

उपमुख्यमंत्री पवार यांनी मात्र या बातम्यांवर सडकून नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, आमची काल मुंबईत महामार्गाच्या वाहतूक कोंडी विषयावर बैठक झाली. त्याला श्री भुजबळ उपस्थित होते. श्री भुजबळ यांचा आज येवला मतदारसंघात कार्यक्रम आहे.

याबाबत आमची कालच चर्चा झाली आहे. आजच्या दौऱ्याबाबत आमचं आधीच ठरलंय. श्री भुजबळ येवल्यातील कार्यक्रमामुळे आज माझ्या दौऱ्यात नसतील. मात्र याबाबत माध्यमांमध्ये उलट सुलट बातम्या प्रसारित होत आहेत. हे सगळे तथ्यहीन आहे. अशा बातम्या का करता? असा प्रश्न त्यांनी केला.

Ajit Pawar & Chhagan Bhujbal
Uddhav Thackrey Politics: उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला धक्का, वसंत गिते यांनी सुरू केला प्रचार!

या विषयावर आज सकाळी राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, गेले पंधरा दिवस मी नाशिक बाहेर होतो. त्यामुळे माझ्या मतदारसंघात जावं लागत आहे. येत्या दहा ऑगस्टला उपमुख्यमंत्री पवार माझ्या मतदारसंघात येणार आहेत.

त्यामुळे त्यांच्या दौऱ्यात प्रत्येक जणाला जाणे शक्य होईलच असे नाही. माझी तब्येत देखील बरोबर नाही आहे. याबाबत उपमुख्यमंत्री पवार यांच्याशी चर्चा झाली आहे. प्रत्येकाला आपापला मतदारसंघ सांभाळण्याची गरज आहे.

या विविध कारणांमुळे मी येवल्याच्या कार्यक्रमात आहे. त्यावर उलट सुलट चर्चा घडविणे बरोबर नाही. अशी चर्चा झाल्याने काही फरकही पडणार नाही. कारण वस्तुस्थिती तशी नाही.

Ajit Pawar & Chhagan Bhujbal
Manoj jarange Patil: जरांगे पाटील घेणार सत्ताधाऱ्यांचा समाचार, कार्यकर्ते झाले रिचार्ज!

येत्या महिन्याभरात विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्षनेते निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दौऱ्याची सुरुवात नाशिकहून केली आहे.

याबाबत प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी या दौऱ्याची घोषणा केली होती. आज आमदार नितीन पवार यांच्या मतदारसंघात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचा कार्यक्रम होत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचे रणशिंग राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आज फुंकण्यात आले. त्यात जेष्ठ मंत्री आणि नेते असलेले भुजबळ जिल्ह्यात असूनही सहभागी झाले नाहीत. त्यामुळे त्याची राजकीय चर्चा होणे अपरिहार्य आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com