BJP Vs Congress news: नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीने आपले आरोपपत्र दाखल केले. त्यावरून राजकीय वातावरण पेटवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. साठी वरिष्ठांकडून आंदोलन करण्याचा आदेश देण्यात आला होता.
भारतीय जनता युवा मोर्चातर्फे आज काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध निदर्शने करण्यात आली. भारतीय जनता युवा मोर्चातर्फे अत्यंत आक्रमकपणे हे आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी काँग्रेस विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
भारतीय जनता युवा मोर्चाने महात्मा गांधी रस्त्यावरील काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न केला. मोठ्या संख्येने जमलेले कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न करीत होते. त्यावेळी पोलिसांची ही चांगलीच धावपळ उडाली. कार्यकर्त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला.
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी पाच हजार कोटी रुपयांची संपत्ती हडप करण्याचा काँग्रेसने त्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा प्रयत्न आहे. या विरोधात सुब्रमण्यम स्वामी यांनी २०१२ पासून न्यायालयात लढा दिला आहे. नवी दिल्ली शहरातील मध्यवर्ती भागातील ही मालमत्ता काँग्रेस नेते आपल्या घशात घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा घोटाळा जनतेचे पैसे लाटण्यासाठी केला जात आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला.
या संदर्भात प्राप्तिकर विभागाने कारवाई केली आहे. सक्त वसुली संचालनालय (इडी) याप्रकरणी सक्रिय झाले. २०२३ मध्ये ईडीने कारवाई केली. प्रकरण अतिशय गंभीर असल्याने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी यावेळी भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
ईडीने यंग इंडिया फाउंडेशन कंपनी आणि नॅशनल हेराल्ड कंपनीची सर्व संपत्ती ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. प्रक्रिया जलद पूर्ण करून न्यायालयामार्फत गांधी यांना शिक्षा मिळेल अशी व्यवस्था करावी, अशी मागणी यावेळी शहर अध्यक्ष सागर शेलार यांनी केली.
या आंदोलनात शहराध्यक्ष शेलार यांसह सचिव प्रशांत वाघ, प्रवीण भाटे, हर्षद जाधव, संदीप शिरोळे, यश बलकवडे, पवन उगले, प्रवीण पाटील, गौरव घोलप, गौरव बोडके यांसह विविध पदाधिकाऱ्यांनी भाग घेतला. या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी याबाबत कोणताही गुन्हा दाखल केलेले नाही.
--------
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.