Prakash Ambedkar : पंतप्रधानांनी जी-२० परिषदेतून देशाची प्रतिष्ठा घालवली!

BJP & RSS wants divide people in to cast against each other : ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी धुळे येथे आदिवासी एल्गार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.
PM Narendra Modi & Adv. Prakash Ambedkar
PM Narendra Modi & Adv. Prakash AmbedkarSarkarnama
Published on
Updated on

Prakash Ambedkar News : भाजप, आरएसएसवाले विविध जातींच्या नावाने सैन्य उभे करीत आहेत. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीपूर्वी सावध व्हा, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केले. (Adv. Prakash Ambedkar criticized BJP on there roll on divedd communities)

अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी धुळे (Dhule) येथे आदिवासी परिषदेला (Trible) संबोधित केले. या वेळी त्यांनी भाजप (BJP) तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

PM Narendra Modi & Adv. Prakash Ambedkar
Maratha Aarakshan : नगरमध्ये 36 गावांमध्ये नेत्यांना 'नो एन्ट्री'; सदावर्ते यांचा पुतळा जाळला

वंचित बहुजन आघाडी आणि एकलव्य आघाडीतर्फे धुळे येथे आदिवासी एल्गार सभा झाली. या वेळी ॲड. आंबेडकर म्हणाले, भाजप-आरएसएसचे हे फसवे राजकारण आहे, याला बळी पडू नका. जी-२० परिषदेसाठी तब्बल एक लाख १३ हजार कोटी रुपये खर्च झाला.

यातून काहीही मिळाले नाही. एवढ्या खर्चात देशातील दारिद्र्य संपले असते; पण केवळ मोदी जगाचे नेते आहेत, हे दाखविण्यासाठी एवढा खर्च करण्यात आला. या परिषदेतून जगासमोर पंतप्रधानांच्या माध्यमातून जगासमोर देशाची प्रतिष्ठा गेली, असा आरोप त्यांनी केला.

या वेळी अॅड आंबेडकर यांनी सर्वच समाजातील युवा वर्गाने चाणाक्ष व्हावे. सावधपणे वागावे. भाजपच्या कोणत्याही राजकीय डावपेचाला बळी पडू नये. जाती-धर्माच्या नावाने डोके फिरू देऊ नका, अन्यथा देशात मणिपूर, पॅलेस्टाईनसारखी स्थिती उभी राहील.

पंतप्रधान यांच्या दौऱ्याचा संदर्भ देत त्यांनी देशातील सध्याच्या राजकारणावर टीका केली. ते म्हणाले, देशात मणिपूरसारख्या राज्यात लोकांची मुंडके छाटली जात असताना पंतप्रधान बोलायला तयार नाहीत. दुसरीकडे ते लहान लहान कामांचे उद्‌घाटन करीत फिरतात. देशात माझ्याशिवाय दुसरे कुणीच नेते नाही, ही त्यांची कार्यपद्धती लोकशाहीसाठी धोकादायक आहे.

PM Narendra Modi & Adv. Prakash Ambedkar
Kolhapur Maratha Reservation : कोल्हापुरातही आरक्षणाचे पडसाद; हसन मुश्रीफांना रेल्वे स्थानकावरच रोखले

या वेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण, ॲड. अरुण जाधव, जिल्हाध्यक्ष अरविंद निकम, संघटक शंकर खरात, उपाध्यक्ष रविकांत वाघ, उत्तर महाराष्ट्र महासचिव वामन गायकवाड, एकलव्य आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अनिलराव जाधव, प्रदेश उपाध्यक्ष ॲड. संतोष जाधव, साईनाथ बर्डे, महेश औताडे, आदिवासी समाज संघाचे महेंद्र माळी, एकलव्य सेनेचे राज साळवे, दिलीप मोहिते, विनोद भोसले, ह.भ.प. माईसाहेब यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

PM Narendra Modi & Adv. Prakash Ambedkar
Sharad Pawar News : लातूरमध्ये शरद पवारांचा भाजपला दे धक्का! ; 'हा' बडा नेता लावला गळाला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com