Nashik News; भाजप दत्तक नाशिकला विसरले की काय?

भाजपने पिंपरी चिंचवडला शास्तीकर माफ केल्याची घोषणा केली मात्र दत्तक नाशिककरांवरील करवाढ आणि शास्ती केव्हा माफ होणार
Laxman Mandale
Laxman MandaleSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : महापालिकेत (NMC) भाजपची (BJP) सत्ता असताना घरपट्टी (Tax) व महापालिकेच्या अन्य करांत भरमसाठ वाढ करण्यात आली. या करवाढीमुळे अनेक नवे उद्योग नाशिकला येण्याचे टाळतात. नागरिकांच्या डोक्यावरील कराचे हे ओझे कायम असतानाच, भाजपने पिंपरी चिंचवडला (Pune) शास्तीमाफीची घोषणा केली आहे. ही नाशिककर (Nashik) नागरिकांची फसवणूक असून भाजपचे लोकप्रतिनिधी यावर गप्प का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते लक्ष्मण मंडाले (Laxman Mandale) यांनी केला आहे. (BJP is doing unfair treatment to Nashik people)

Laxman Mandale
Sanjay Raut News; ‘ती’ शरद पवारांची राजकीय खेळी?

पुणे शहरात कसबा आणि पिंपरी चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघात येत्या 26 फेब्रुवारीला पोटनिवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रचार शिगेला पोहोचला आहे. विरोधक व भाजपने प्रचारात कोणतीच कसर सोडलेली नाही. यामध्ये झालेल्या एका घोषणेने नाशिककरांमध्ये नाराजी आहे.

Laxman Mandale
Shivsena News: आक्रमक व्हा, विरोधकांना सडेतोड उत्तर द्या!

भारतीय जनता पक्षाने ट्वीट केले आहे. त्यात 2008 पासून प्रलंबित असलेला शास्तीकराचा मुद्दा कायमचा निकाली काढला आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण भाऊ जगताप आणि भोसरीचे आमदार महेशदादा यांनी याबाबत वेळोवेळी आवाज उठवला होता. राष्ट्रवादीने फक्त पिंपरी चिंचवडकरांना शास्तीकरमाफीची स्वप्नेच दाखवली! असे म्हटले आहे.

ते म्हणाले, शास्तीकरमाफी तसेच महापालिकेने एकतर्फी वाढविलेली घरपट्टीचा भरमसाठ कर माफ व्हावा यासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांनी ठराव केला आहे. हा कर वाढत असताना अनेक नागिरकांनी आंदोलन केले.

काही नगरसेवकांनी याबाबत उच्च न्यायालयात दाद मागीतली आहे. मात्र नाशिककरांच्या डोक्यावरचे हे कराचे ओझे कमी व्हायला तयार नाही.

त्याची मध्यमवर्गीय, कामगार तसेच उद्योग-व्यावसायांनाही मोठी झळ बसत आहे. महापालिकेत भाजप सत्तेत आहे. शहरातील तिन्ही आमदार भाजपचे आहेत. तत्कालीन पालकमंत्री गिरीष महाजन हे देखील भाजपचेच. नगरविकास खाते भाजपकडेच.

गंमत म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी नाशिक शहर दत्तक घेतल्याचे जाहीर केले होते. मग दत्तक नाशिक शहर व नागिरकांचा भाजपला विसर पडला की काय? असा प्रश्न पडतो.

श्री. मंडाले म्हणाले, भारतीय जनता पक्षाकडे सर्व सत्ता दिलेली आहे. शहरातील तिन्ही आमदार या विषयावर गप्प कसे?. चिंचवड येथे पोटनिवडणूक असल्याने भाजपने तेथील मतदारांना खुश करण्यासाठी शास्तीकरमाफीची घोषणा केली असेल तर हे योग्य नाही. हा नाशिककरांसाठी देखील गंभीर प्रश्न आहे. त्याचा देखील विचार झाला पाहिजे. शास्तीकराचा प्रश्न राज्य शासनाने अर्थात भाजपने तातडीने सोडवावा, अन्यथा नाशिककर या अन्यायाचे योग्य उत्तर देतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com