हिदूत्ववादी भाजपने सुरु केले जातनिहाय मतदारांचे माहिती संकलन

महापालिका निवडणूक तयारीचा भाग म्हणून राजकीय पक्षांची विविध स्तरावर तयारी सुरु आहे.
BJP nashik city president Girish Palve
BJP nashik city president Girish PalveSarkarnama

नाशिक : महापालिका निवडणूक तयारीचा भाग म्हणून राजकीय पक्षांची विविध स्तरावर तयारी सुरु आहे. (Political parties begin NMC Election prepration in city) भारतीय जनता पक्षाने याबाबत एक पाऊल पुढे टाकले आहे. (BJP take one step forward) त्यांनी प्रत्येक प्रभागात जाऊन जातनिहाय मतदारांची माहिती व संख्या संकलीत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. (they instruct to collect castwise voters information of Every ward) अतिशय गोपनिय पद्धतीने सुरु असलेली ही प्रक्रीया डिजीटल माध्यामांवर आल्याने तो चर्चेचा विषय आहे.

BJP nashik city president Girish Palve
जिवलग मित्राच्या भेटीने शरद पवारही भारावले!

भारतीय जनता पक्ष जात मानत नाही. हिदूत्ववादी असल्याचा दावा सतत केला जात असला तरी नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी, मंडल अध्यक्षांकडून जातीनिहाय मतदारांची आकडेवारी मागविण्यात आली आहे. त्यांच्या या भूमिकेने पक्षाचे सर्वच गोंधळात सापडले आहे.

BJP nashik city president Girish Palve
एकनाथ खडसेंचे विरोधक अडचणीत; उमेदवारीचे कागदपत्र निघाले बनावट

प्रत्येक राजकीय पक्षाकडून जातीनिहाय माहिती घेतली जात असली तरी आतापर्यंत उघडपणे कोणी अशी माहिती घेतलेली नव्हती. पक्षीय पातळीवर अत्यंत सावध पद्धतीने जातीनिहाय मतांचा अंदाज घेतला जातो. त्यात काही वावगे आहे, अशी टिका देखील आजवर झालेली नाही. परंतु, जाहीरपणे हिंदूत्ववादी भूमिका घेणाऱ्या भाजपकडून उघडपणे जातनिहाय मतदारांची माहिती संकलित केली जात आहे. त्यामुळे तो चर्चेचा विषय आहे.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय पक्षाकडून संघटनेची बांधणी करण्याबरोबरच संभाव्य उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. प्रभागरचना निश्चित झाल्यावर संभाव्य उमेदवार निश्‍चित करण्याचे काम राजकीय पक्षाकडून सुरू होईल. त्यापूर्वी ज्या भागात किंवा प्रभागात ज्या जातीचे मतदान अधिक आहे. त्या समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाते. प्रत्येक निवडणुकीत सर्वच पक्षाकडून असा कार्यक्रम राबविला जातो. उमेदवारी का दिली, या संदर्भात कारणे देताना ठराविक अंतर्गत स्तरावर त्याचा अभ्यास केला जातो. विकासकामे, उमेदवाराचे त्या भागातील कार्य, संपर्क, उपक्रमही उमेदवारी मागणारे व उमेदवारी देणारे दोन्ही विचारात घेतात. त्यात आता उघडपणे या नव्या माहितीची भर पडली आहे.

निवडणुकीत अडचणीची शक्यता

शहरात भाजपचे दहा मंडल आहेत. सर्वच मंडल अध्यक्ष पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना व्हॉटसॲपद्वारे माहिती पोचविण्याचे संदेश शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी दिले. त्यात पंचवटीतील सध्याच्या प्रभाग क्रमांक एक, चार आणि सहामध्ये मराठा, वंजारी, धनगर, माळी, सोनार, सुतार, वैदू, बेलदार, कुंभार, तेली, आदिवासी, ब्राम्हण, दलित, जैन, गुजराथी, मारवाडी याप्रमाणे प्रभागनिहाय माहिती मागविली आहे. निवडणूक आयोगाने मतदारांच्या जातीचा उल्लेख होऊ नये यासाठी विविध बंधने घातली आहेत. यामध्ये त्याचे उल्लंघण तर होत नाही ना?, हे अद्याप स्पष्ट नाही.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com