Sujay Vikhe : लोकसभेतील पराभवात काय चूक झाली; सुजय विखेंनी सांगितली

Sujay Vikhe explained the mistake behind the defeat in the Lok Sabha elections : सुजय विखे यांच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवामागील वेगवेगळी कारणं आहेत. परंतु सुजय विखेंनी पराभवातील सांगितलेली चूक चर्चेत आली आहे.
Sujay Vikhe
Sujay VikheSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अटीतटीची झाली. शरद पवार आणि राधाकृष्ण विखे यांचा संघर्ष पाहायला मिळाला. या निवडणुकीत भाजपचे सुजय विखे यांचा पराभव झाला.

भाजपचं निवडून येणारं फिक्स जागा गेली. सुजय विखे यांच्या पराभवाची वेगवेगळी कारणं सांगितली जात आहे. त्यावर चर्चा होत आहे. परंतु सुजय विखेंनी पराभव माझ्या चुकीमुळे झाला असल्याचं म्हटलं आहे. सुजय विखे यांचे हे विधान आता चर्चेत आलं आहे.

भाजपचे (BJP) माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी पाठपुराव्यामुळे झालेल्या 'वांबोरी चारी 2' टप्प्याचे कामाचं लोकार्पण कार्यक्रमात माजी खासदार सुजय विखे बोलत होते. सुजय विखे यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाला माझीच चूक असल्याचं यावेळी म्हटलं. सुजय विखे ही चूक सांगत असताना त्यांचे वडील भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे देखील उपस्थित होते.

Sujay Vikhe
Radhakrishna Vikhe Vs Sharad Pawar : '..आणि आपण त्यांचे फोटो लावत बसायचे का?' ; मंत्री विखेंची शरद पवारांच्या राजकारणावर टीका!

सुजय विखे म्हणाले, "लोकसभा निवडणुकीत (Election) माझा पराभव झाला. हा पराभव माझ्या चुकीमुळे झाला. कारण, मी 25 ते 30 वर्षापूर्वीपासून साचलेली विकास कामे 3 वर्षांत मार्गी लावली. नगर शहरातील उड्डाणपूल, बायपास, करमाळा रस्ता आदीसह विविध विकासाची कामे मार्गी लावली. डॉक्टर म्हणून ही आजारं, मी कायम स्वरूपी संपवले, ते मी जर कायमस्वरूपी ठेवले असते, तर! आता तुम्हीच ठरवा, कोणता डॉक्टर योग्य आहे".

Sujay Vikhe
Radhakrishna Vikhe : 'काय बोलतात याचं भानच नाही'; राहुल गांधींवर मंत्री विखेंचा निशाणा

विरोधकांकडून देखील चूक मान्य

सुजय विखे यांनी अनेक लोकांना मी पडल्याचं पाहून आनंद झाला. मात्र माझा कार्यक्रम नाही झाला, तर तुमच्या पुढच्या पिढीसाठी पाहिलेले विकासाचे स्वप्न अपुरे राहिले, आज विरोधी माणूस सुद्धा म्हणतो की, सुजय विखेंसारखी कामे कोणीही करू शकत नाही, यासाठी योग्य डॉक्टर, योग्य आजारावर असणे गरजेचे आहे, असे सांगितले.

राजकारणातून संन्यास घेणार नाही

"मुळा धरणामध्ये 5 टीएमसी पाणी उरले, तरी वांबोरी चारीला पाणी सोडण्याचे काम करणार आहे. मुळा धरण येथे सोलर प्रोजेक्ट उभारायचा होता, आता तुम्ही जबाबदारीतून मुक्त केले आहे, विकास कामे करणाऱ्या माणसाचा पराभव करत राहिले, तर तुम्हाला पुढची पिढी माफ करणार नाही. मी राजकारणातून संन्यास घेणार नाही. माझ्या निवडणुकी वेळेस दुधाचे सॉफ्टवेअर बंद पडले, कांद्याचे भाव 10 रुपये किलो झाले, याचा परिणाम मला भोगाव लागला आहे", असेही सुजय विखे यांनी म्हटलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com