

Ahilyanagar political developments : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक यांची बहीण माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांच्या भाजप प्रवेश चर्चांना श्रीरामपूरमध्ये बळ मिळू लागलं आहे. भाजप माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी या चर्चांवर प्रतिक्रिया दिली.
'हे मला माहित नाही, महायुती होते की नाही हा देखील प्रश्न, या काही बातम्या चर्चेत आहेत, कुणाचा प्रवेश, कधी प्रवेश, यापैकी कोणताही भूकंप नाही,' असे सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने श्रीरामपूरमध्ये (Shrirampur) बऱ्याच राजकीय उलथापालथी होत आहे. भाजपमधील विखे पिता-पुत्रांचे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांचे श्रीरामपूरमध्ये दौरे वाढले आहेत. श्रीरामपूरमध्ये राजकीय भूकंप घडवण्याच्या तयारी विखे पिता-पुत्रांनी सुरू केली आहे.
श्रीरामपूर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना बळ घेतलं आहे. महाराष्ट्र कृषक समाज अध्यक्ष, साईसंस्थांच्या माजी विश्वस्त असलेल्या अनुराधा आदिक यांची श्रीरामपूरमध्ये मोठी राजकीय ताकद आहे. त्यांचे बंधू अविनाश आदिक हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस आहेत. अलीकडे होत असलेल्या राजकीय घडामोडींनी श्रीरामपूर ढवळून निघू लागलं आहे. यातच अनुराधा आदिक या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना पेव फुटले आहे. यावर सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांनी प्रतिक्रिया दिली.
विखे पाटील म्हणाले, "अनुराधा आदिक भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे मला माहिती नाही. त्या युतीच्या उमेदवारांमध्ये फिरत असतात, ते देखील मला माहिती नाही. महायुती होत की नाही, हा देखील प्रश्न आहे. आमचा प्रयत्न आहे की, महायुती झाली पाहिजे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत वेगवेगळे नेते मंडळी आहे, त्यांचा समन्वय करण्याचा प्रयत्न करू. पण, या प्रवेशाच्या बातम्या उडतात, यापैकी एकही भूकंप नाही."
श्रीरामपूरमध्ये राजकीय भूकंप करणार असल्याचे विधान सुजय विखे पाटील यांनी केले होते. त्यावर बोलताना म्हणाले, "भूकंप हा माणूस झोपेत असतो, तेव्हा भूकंपाचे धक्के बसतात. हा भूकंप असाच होईल. घटना होईल, तेव्हा कळेल. दहा तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत अर्ज भरण्याची वेळ आहे. 17 तारखेपर्यंत वेळ आहे आम्हाला."
'भाजपचा कोणताही नगरसेवक काँग्रेसमध्ये गेलेला नाही. जे काँग्रेसमध्ये गेले आहेत, ते 17 तारखेच्या आत भाजपमध्ये परत येऊ शकतात. ते सगळीकडे जाऊन आलेले आहेत. संगमनेरला जाऊन प्रवेश झाल्याने काही भूकंप झाला, असं काही नाही. निकाल लागल्यावर तुम्हाला बरच काही कळेल,' असा दावा सुजय विखे पाटील यांनी केला.
नगरपरिषदेच्या निवडणुकीत युती, महायुती राहू अगर ना राहू, तरी देखील उमेदवार हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचाच राहील,असा दावा केला जात आहे. यावर सुजय विखे पाटील यांनी, 'महायुतीमधून शिवसेनेला उमेदवारी दिली नाही, तर शिवसेना स्वतंत्र लढेल, हे मी बरेच वेळा ऐकलं आहे. आमची काही हरकत नाही. स्वतंत्र पक्ष आहे. त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे. मी कधीही म्हटलो नाही की, स्वबळावर लढणार, आम्हाला महायुतीची आवश्यकता आहे. भाजप महायुती होण्याचा प्रयत्न पूर्ण ताकदीने करेल. महायुती म्हणून, नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा महायुतीचा राहील, हा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील,' असे सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.