Sujay Vikhe on Satyajeet Tambe BJP : सत्यजीत तांबेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा; विखे म्हणाले, 'मामा, भाचे, पुतणे कोणीही आलं तरी...'

BJP Sujay Vikhe Reacts to Nashik Graduate MLC Satyajeet Tambe Possible BJP Entry in Shirdi : नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर माजी खासदार सुजय विखे यांची प्रतिक्रिया.
Sujay Vikhe on Satyajeet Tambe BJP
Sujay Vikhe on Satyajeet Tambe BJPSarkarnama
Published on
Updated on

Satyajeet Tambe BJP entry : नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांचा भाजप प्रवेशाच्या चर्चांवर माजी खासदार सुजय विखे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

सुजय विखे यांनी संगमनेरच्या राजकारणावरून थोरात-तांबे, मामा-भाचाशी राजकीय संघर्षाचे संकेत दिले आहे. 'कोणी पक्षात नवीन येत असेल, तर त्याला मी विरोध करणे संयुक्तिक होणार नाही. मामा, भाचे, पुतणे कोणीही आलं तरी जनतेच्या हितासाठी आम्हाला जे योग्य वाटतं ते आम्ही करत राहणार', असे म्हणत राजकीय संघर्षाचे संकेत सुजय विखे यांनी दिले आहे.

आमदार सत्यजीत तांबे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी जवळीक वाढली आहे. यातून त्यांच्या भाजपच्या प्रवेशाच्या चर्चा वाढल्या आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर विधानसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर या चर्चांना बळ वाढलं आहे. आमदार तांबे यांनी सकाळ माध्यम समूहाच्या 'सरकारनामा' डिजिटलशी संवाद साधताना, देवेंद्र फडणवीस आणि मार्गदर्शकांच्या सूचनेनुसार योग्य वेळी निर्णय घेऊ, असे संकेत दिले.

भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "याबाबत काय निर्णय घ्यायचा, ते मुख्यमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ निर्णय घेतील. कोणाशीही मैत्री ही मैत्रीच्या जागेवर असते. आम्ही देखील भाजपत आलो, त्यावेळेस काही लोकांना आवडलं नसेल. मात्र पक्षाने त्यावेळी योग्य तो निर्णय घेतला".

Sujay Vikhe on Satyajeet Tambe BJP
Lal Nishan And Communist Party merger : देशात मोठी राजकीय घडामोड; लाल निशाण पक्षाचं 'भाकप' लिबरेशनमध्ये 'विलय'

'भाजप पक्षात कोणी नवीन येत असेल, तर त्याला मी विरोध करणे संयुक्तिक होणार नाही. तिकडं काय व्हायचं ते होऊ दे, संगमनेर तालुक्याच्या महत्त्वाच्या प्रश्नांमध्ये आम्ही मागे हटणार नाही. भविष्यात एका पक्षात असलो, तरी स्थानिक राजकारण हे वेगळं असतं ते कायम राहील', अशी भूमिका सुजय विखे यांनी घेतली.

Sujay Vikhe on Satyajeet Tambe BJP
Top 10 News : हगवणे कुटुंबियांचा पाय आणखी खोलात; भारतीय निवडणूक आयोगाचा सर्वात मोठा निर्णय - वाचा महत्त्वाच्या बातम्या

कोणी पक्षात आलं किंवा नाही आलं, तरी आमच्या 50 वर्षांत जे राजकारण झालं ते यापुढेही सुरूच राहील. मामा, भाचे, पुतणे कोणीही आलं तरी जनतेच्या हितासाठी आम्हाला जे योग्य वाटतं ते आम्ही करत राहणार, असे म्हणत सुजय विखे यांनी थोरात अन् तांबे, मामा-भाचे यांना सूचक इशारा दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com