BJP Vs NCP : जळगाव जिल्ह्यात काँग्रेसनंतर राष्ट्रवादीला हादरा, 'हा' नेता भाजपच्या वाटेवर

Sanjay Garud :संजय गरुड यांनी गिरीश महाजन यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी कडून विधानसभा निवडणुक लढविली होती. मात्र त्यांचा पराभव झाला.
Sanjay Garud
Sanjay Garudsarkarnama
Published on
Updated on

Jalgaon: जळगाव जिल्ह्यात डॉ.उल्हास पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून काँग्रेसला झटका दिला. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते संजय गरुड हे सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. याबाबत आपण दोन दिवसांत निर्णय घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. गिरीश महाजन यांनी उल्हास पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला तेव्हा अजून एक भूकंप होणार असल्याचे जाहीर केले होते. त्याचा प्रत्यय संजय गरुड यांच्या रुपाने आला आहे.

Sanjay Garud
Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विचारलं मिंधे कोण?

जळगाव जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे माजी खासदार डॉ.उल्हास पाटील ( Ulhas patil) यांनी नुकताच मुंबई येथे कन्या डॉ. केतकी पाटील यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी पक्षाचे नेते गिरिश महाजन (Girish Mahajan) व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आमदार मंगेश चव्हाण उपस्थित होते.गिरीश महाजन यांनी जळगाव जिल्ह्यात आणखी एक भूकंप होईल, असे जाहीर केले होते. मात्र त्यांनी त्याचा उल्लेख केला नव्हता. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे निष्ठावंत कार्यकर्ते व पदाधिकारी संजय गरूड यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

येत्या दोन दिवसांत निर्णय घेणार असल्याचे स्वतः संजय गरुड यांनी जाहीर केले आहे. त्यांनी भाजपत प्रवेश करू नये, म्हणून अनेक पदाधिकाऱ्यांनी विनंतीही केली. मात्र आपल्याला अंतिम निर्णय घेण्याची गरज आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. त्यामुळे त्यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे. संजय गरूड हे मंत्री महाजन यांच्या जामनेर विधानसभा मतदार संघातील शेंदुर्णी येथील रहिवाशी आहेत.

महाजनांचे कट्टर विरोधक

संजय गरुड यांनी महाजन यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी कडून विधानसभा निवडणुक लढविली होती. मात्र त्यांचा पराभव झाला. ते जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत. महाजन यांचे ते कट्टर विरोधक मानले जात होते. जामनेर भागातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ते भक्कम नेता मानले जातात. त्यांनी भाजपत प्रवेश केल्यास या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार आहे.

(Edited By Roshan More)

Sanjay Garud
Bjp News : उल्हास पाटलांचा राजकीय मार्ग ठरला; काँग्रेसचा 'हात' सोडत भाजपच्या गोटात दाखल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com