भाजप नाशिक महापालिकेत लढणार स्वबळावर

महापालिकेच्या १३३ जागांसाठी इच्छुकांना अर्ज भरण्याचे आवाहन
Girish Palve, BJP.
Girish Palve, BJP.Sarkarnama
Published on
Updated on

नाशिक : भाजपने (BJP) केलेल्या निवडणूकपूर्व सर्वेक्षणात पुन्हा अच्छे दिन येणार असल्याची चिन्हे दिसू लागल्यानंतर आता भाजपकडूनदेखील शिवसेनेला (Shivsena) टक्कर देण्यासाठी नाशिक शहरात (NMC) शंभर प्लसचा नारा देण्यात आला आहे. प्रारूप प्रभागरचना जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. सर्वच जागांसाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आल्याने भाजप स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट झाले.

Girish Palve, BJP.
महाविकास आघाडीने भाजपकडून किमान एव्हढं शिकावंच!

भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी त्यांच्यामार्फत घोषणा केली. १३३ जागांसाठी इच्छुकांनी आपल्या संपूर्ण बायोडाटासह अर्ज भरून देण्याचे आवाहन त्यांनी केले. इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहे. त्यानंतर उमेदवारांची निवड केली जाईल, असे पालवे यांनी जाहीर केले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सोमवारी (ता. २१) नाशिकमध्ये येत असून, त्यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

Girish Palve, BJP.
जेव्हा कृषीमंत्री भुसे अनुदान रोखणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात धरणे धरतात!

निवडणूक हालचाली गतिमान

प्रारूप प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झाल्या आहेत. सत्ता राखण्यासाठी भाजपने पुन्हा एकदा कंबर कसली असून, केंद्र सरकारच्या माध्यमातून झालेल्या कामांचे मार्केटिंग करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पक्षाकडून झालेल्या सर्वेक्षणात पुन्हा अच्छे दिन येणार असल्याचे दिसून येत असल्याने आता शंभर प्लसचा दावा केला जात आहे. त्यासाठी शहरातील सर्व ४४ प्रभागांतील १३३ जागांवर निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांनी स्वतःची संपूर्ण माहिती असलेला फॉर्म भरून देण्याचे आवतन देण्यात आले आहे. पक्षाच्या वसंतस्मृती कार्यालयात इच्छुकांचे फॉर्म उपलब्ध करून देण्यात आले आहे. दहा मंडल अध्यक्ष किंवा भाजप कार्यालयामधून इच्छुकांनी फॉर्म घेऊन भरून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

उद्‌घाटनांचे बार

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या या दौऱ्यात विविध विकासकामांचे उद्‌घाटन होणार आहे. कार्यकर्त्यांचा मेळावा, प्रभाग क्रमांक २७ मध्ये पाथर्डी फाटा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण प्रभाग क्रमांक ९ मधील नगरसेवक दिनकर पाटील यांच्या निधीतून तयार करण्यात आलेल्या प्रा. वसंतराव कानेटकर उद्यानाचे उद्‌घाटन होणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्याने शहरात येत्या पंधरा दिवसात उद्‌घाटनाचे कार्यक्रम होतील.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com