क्रूझ पार्टी प्रकरणात धुळ्याचे सुनील पाटील यांचे नाव; धुळे पुन्हा केंद्रस्थानी

भाजपच्या कंबोज यांचा आरोप, आयर्न खान प्रकरणात धुळ्याचे सुनिल पाटील केंद्रस्थानी.
Mohit comboz OF BJP
Mohit comboz OF BJPSarkarnama
Published on
Updated on

धुळे : क्रूझ पार्टी प्रकरणामध्ये धुळ्यातील सुनील पाटील (Sunil Patil) यांचे नाव आज समोर आले आहे. क्रूझ पार्टी प्रकरणातील संशयित म्हणून समोर आलेल्या सॅम डिसूजा (Sam D`souza) यांनी प्रसार माध्यमांसमोर धुळ्यातील सुनील पाटील याचा खुलासा केला आहे. धुळ्यातील सुनील पाटील यांनीच सॅम डिसूजा यांना फोन करून पार्टीची कल्पना दिली होती. त्यामुळे धुळे शहर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

Mohit comboz OF BJP
विधानसभा उपसभापती नरहरी झिरवाळांनी दिवाळीत आळवली पारंपारीक गिते!

यासंदर्भात नाव पुढे येताच सुनील पाटील यांच्या धुळ्यातील बंगल्याला गेल्या पाच ते सहा दिवसांपासून कुलूप असल्याचे स्पष्ट झाले. सचिन वाजे प्रकरणानंतर पुन्हा एकदा आर्यन खान प्रकरणात धुळ्याचा उल्लेख आला आहे. त्यामुळे धुळे शहर पुन्हा चर्चेत आल्याने शहरातील राजकीय तसेच नागरीकांत चर्चेचा विषय ठरला.

Mohit comboz OF BJP
इंदुरीकर महाराज, `तारतम्य ठेवा, नाही तर गयावया करीत पळत फिरावे लागेल`

दरम्यान याबाबत भाजप नेते मोहित कंबोज यांनी एक पत्रकार परिषद घेऊन आयर्न खान ड्रग प्रकरणात भारतीय जनता पक्षाला लक्ष्य करण्यात आले. मात्र यामागे खरे मास्टरमाईंड सुनिल पाचटील आहेत. ते धुळ्याचे आहेत. त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी ते गेले वीस वर्षे संबंधीत आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी त्यांचे संबंध आहेत. तसेच देशमुख यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांच्याशी ते अतिशय क्लोज संबंध ठेऊन आहेत. राज्यातील पोलिसांच्या बदल्यांच्या रॅकेटमध्ये त्यांचा नजीकचा संबंध आहे. यामध्ये आर्थिक व्यावहार स्वतः पाटील पहात होते. ते आपल्या गँगसह पंचतारांकीत हॅाटेल्समधून हे सर्व काम करीत होते. त्यांचे राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच सर्व मंत्र्यांची संबंध आहेत.

श्री. पाटील यांनी व्हाटस्अॅप द्वारे संदेश पाठवून सॅम डिसूझा यांच्याशी संपर्क केला. त्यात एकोणतीस व्यक्तीची नावे देऊन त्यात क्रूझ पार्टी होणार आहे. त्यात ड्रग्जचे सेवन केले जाईल व पुरवठा देखील केला जाईल. मला एसीबी अधिकाऱ्याशी संपर्क करून द्यावा. माझ्याकडे त्याबाबत मोठी माहिती आहेत. त्यानंतर त्यांनी व्ही. व्ही. सिंग यांच्याशी संपर्क केला. त्यावरून हे प्रकरण घडले आहे, असा आरोप भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com