Bogus Shalarth ID Scam : शिक्षण खात्यात मोठा स्फोट! 841 पेक्षा जास्त बोगस शालार्थ आयडी, शिक्षणाधिकारी अन् उपशिक्षणाधिकाऱ्यासह 48 जण 'SIT'च्या रडारवर

SIT issues notices to 48 individuals, including education officials, in Jalgaon bogus Shalarth ID scam probe : जळगावच्‍या माध्‍यमिक शिक्षण विभागातील आजी– माजी शिक्षणाधिकारींसह उपशिक्षणाधिकारी, कर्मचारी मिळून 48 जणांना SITने सुनावणीसाठी नोटीस बजावल्या आहेत.
Bogus Shalarth ID Scam
Bogus Shalarth ID ScamSarkarnama
Published on
Updated on

jalgaon education department scam : राज्यातील बोगस शालार्थ आयडी प्रकरणाचा विशेष पथकाकडून (SIT) तपास सुरू आहे. यात सुमारे 150 कोटी रुपयांचा महाघोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणी 841 हून अधिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थाचालकांवर गुन्हे दाखल असून, जळगाव, नाशिक, नंदुरबारमधील सुमारे 1000 हून अधिक शिक्षकांवर अटकेची टांगती तलवार आहे.

आता 'SIT'ने जळगावच्या माध्‍यमिक शिक्षण विभागातील आजी– माजी शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे तपास वळवला आहे. 'SIT'ने 48 जणांना सुनावणीसाठी नोटीस बजावली आहे.

बोगस शालार्थ आयडी प्रकरणात जळगाव जिल्‍ह्यातील काही शाळांनी पडताळणी न करताच परस्‍पर शिक्षक– शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. हे प्रकरण जळगाव (Jalgaon) जिल्‍ह्यात चांगलेच गाजत आहे. याच प्रकरणात ऑक्‍टोबर 2025 मध्‍ये नाशिकच्‍या आर्थिक गुन्‍हे शाखेच्‍या पथकाने जळगावात येत दहा शाळांच्‍या मुख्‍याध्‍यापकांची चौकशी करत आवश्‍यक ती कागदपत्रे ताब्‍यात घेतली होती. तसेच त्‍यांना नोटीस बजावत चौकशी लावली होती.

या प्रकरणाची 'SIT'तर्फे चौकशी केली जात असून, यात माध्‍यमिक शिक्षण (Education) विभागातील तत्‍कालीन शिक्षणाधिकाऱ्यांसह उपशिक्षणाधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी लावत सुनावणीसाठी नाशिक इथं बोलावण्यात आले आहे.

सन 2013 ते 2026 या कालवधीत नाशिक विभागातील शालार्थ प्रणालीमध्‍ये नाव समाविष्‍ठ केलेल्‍या खासगी प्राथमिक व माध्‍यमिक शाळातील 892 कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडीमध्‍ये अनियमितता आहे.

या प्रकरणी जळगावच्‍या माध्‍यमिक शिक्षण विभागातील 48 जणांची सुनावणी लावली आहे. यासाठी या सर्वांना 15 ते 18 एप्रिल दरम्‍यान नाशिक विभागीय मंडळ येथे सुनावणीसाठी उपस्‍थीत राहण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

या अधिकाऱ्यांना नोटिसा

एसआयटीमार्फत सुनावणीसाठी नोटीस दिलेल्‍यांमध्‍ये 11 जण तत्‍कालीन शिक्षणाधिकाऱ्यांचा समावेश आहे. यात आर. डी. विसपुते, एस.बी. हिंगोणेकर, एस. टी. वराडे, डी. पी. महाजन, बी. जे. पाटील, बी. एस. अकलाडे, डॉ. नितीन बच्‍छाव, विकास पाटील, सचिन परदेशी, डॉ. किरण कुंवर, डॉ. एम. व्‍ही. कदम या शिक्षणाधिकाऱ्यांसह 11 उपशिक्षणाधिकारी, 3 कक्षाधिकारी, याशिवाय वरिष्‍ठ सहाय्यक, कनिष्‍ठ सहाय्यक, अशा 48 जणांचा समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com