राणांवर कारवाई करता मग मिटकरींवर का नाही?

ब्राह्मण महासंघातर्फे काढलेल्या मोर्चात अमोल मिटकरी यांच्यावर कारवाईची मागणी
Bramhin Community Morcha at Nashik
Bramhin Community Morcha at NashikSarkarnama

नाशिक : हनुमान चालीसा म्हणन्याचा आग्रह धरला म्हणून राणा (Rana Couple) दाम्पत्यांवर कारवाई केली जाते. मग आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी देखील दोन समाजांत तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले आहे. शरद पवार (Sharad Pawar) त्यांच्यावर कारवाई का करीत नाही?. राज्य सरकार मिटकरी यांच्या विरोधात गुन्हा का दाखल करीत नाही, असा प्रश्न ब्राम्हण (Bramhin Community) समाजाच्या मोर्चेकऱ्यांनी केला.

Bramhin Community Morcha at Nashik
राखी सावंतने नोटीस मिळताच मागितली माफी!

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ बुधवारी ब्राह्मण महासंघातर्फे नाशिकमध्ये मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सर्वपक्षीय नेते व ब्राह्मण महासंघाच्या विविध संघटना सहभागी झाल्या होत्या. मोर्चेकऱ्यांच्या जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. मोर्चानंतर निवडक पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात ब्राह्मण समाजाबद्दल काढलेल्या कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Bramhin Community Morcha at Nashik
अब्दुल सत्तार यांच्यावर करून शिवसेनेने धर्मनिष्ठा दाखवावी!

मध्यंतरी सांगली येथे राष्ट्रवादी काँग्रेस सभेत अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्यावर ब्राम्हण समाज नाराज आहे. त्याच्या निषेधार्थ मोर्चाचे आयोजन केले होते. सर्वपक्षीय ब्राम्हण नेत्यांनी एकजूट दाखवून यापुढे कोणीही ब्र शब्द काढल्यास त्यांना त्यांची जागा दाखवून दिली जाईल, असा इशारा दिला. मोर्चाचे नेतृत्व बाळासाहेब पाठक, आनंद दवे, भगरे गुरुजी, लक्ष्मण सावजी, धनंजय बेळे, ॲड. भानुदास शौचे, पराग शिंत्रे, ॲड. अविनाश भिडे आदींनी केले.

या वेळी आमदार देवयानी फरांदे, राहुल ढिकले, उत्तमराव उगले आदींनीही मोर्चाला हजेरी लावून मागणीला पाठिंबा दिला.

मोर्चात सहभागी संस्था

मोर्चात अखिल मध्यवर्ती ब्राह्मण संस्था, शुक्ल संस्था, देशस्थ ऋग्वेद ब्राह्मण संस्था, चित्तपावन ब्राह्मण संस्था, ब्राह्मण महासंघ, नाशिक रोड ब्राह्मण सभा, इंदिरानगर ब्राह्मण संस्था, नवीन नाशिक ब्राह्मण संस्था, सातपूर ब्राह्मण संघटना, गंगापूर रोड ब्राह्मण बंधू आणि भगिनी संस्था, पंचवटी ब्राह्मण बंधू आणि भगिनी संस्था, जुने नाशिक ब्राह्मण संस्था, अशोका मार्ग ब्राह्मण संस्था, गुजराथी ब्राह्मण संस्था, कान्यकुंज ब्राह्मण संस्था, हिंदी भाषिक ब्राह्मण संस्था, कराडे ब्राह्मण संस्था, कर्नाटकी ब्राह्मण संस्था, जगदंबा सेवा परिवार, परशुराम प्रतिष्ठान, नाशिक ब्राह्मण महिला संघ व संस्था, विश्वब्राह्मण नाशिक जिल्हा , वैदिक सनातन हिंदू धर्म सभा आदी सहभागी झाले होते.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com