अब्दुल सत्तार यांच्यावर करून शिवसेनेने धर्मनिष्ठा दाखवावी!

गिरीश महाजन यांनी नाशिक येथे शिवसेनेवर टिका केली.
Abdul Sattar & Girish Mahajan
Abdul Sattar & Girish MahajanSarkarnama

नाशिक : शिवसेना (Shivsena) सातत्याने हिंदूत्वाचा (Hindutwa) आव आनत असली तरीही खरे हिंदू जाणतात की, शिवसेनेचे खरे स्वरूप केवळ सत्तेसाठी तडजोड करणारे असेच आहे. त्यांनी सत्तेसाठी हिंदूत्वाची आहुती दिली आहे, अशी टिका भाजप (BJP) नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केली.

Abdul Sattar & Girish Mahajan
राखी सावंतने नोटीस मिळताच मागितली माफी!

श्री. महाजन म्हणाले, सत्तेसाठी शिवसेना कुठल्याही प्रकारची तडजोड करू शकते. हिंदुत्वाची आहुती देण्यात आली, हेच मोठे उदाहरण आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांच्या व्हायरल व्हिडियोवर शिवसेनेने कारवाई करून धर्मनिष्ठा दाखविण्याचे आवाहन गिरीश महाजन यांनी केले.

Abdul Sattar & Girish Mahajan
भारनियमनाच्या संकटात नाशिकने उर्जानिर्मितीत ६० वर्षाचे रेकॅार्ड मोडले!

ते म्हणाले, राज्याचे सामाजिक वातावरण खराब करण्याचा भाजपचा अजिबात हेतू नाही. परंतु, राज्याची परिस्थिती इतकी बिकट बनली आहे हेदेखील तितकेच खरे आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावा की नाही याचा निर्णय राज्यपाल घेतील. भोंग्याच्या प्रकरणात गृहमंत्र्यांनी बैठक बोलाविली, परंतु मुख्यमंत्र्यांना त्याचे गांभीर्य नाही. सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी ही भाजपची भूमिका आहे. परंतु, मुख्यमंत्री या प्रश्‍नाबाबत गंभीर नाही. मुख्यमंत्री सहकुटुंब आजीबाईंना भेटण्यासाठी जातात, परंतु बैठकीला जात नाही. यावरून सरकार या प्रश्‍नावर किती गंभीर आहे, हे लक्षात येते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा नगरसेवक असल्याने छगन भुजबळ यांना महापालिकेत जाता आले नाही, परंतु आता प्रशासकीय राजवट आल्याने महापालिकेत जाऊन त्यांनी कामांचा आढावा घेतला. त्यात हे थांबवा, ते थांबवा हा राज्याच्या महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ते महापालिकेत राबवत आहे. परंतु भुजबळांना याचे उत्तर नाशिककर महापालिकेच्या निवडणुकीत देतील.

पूर्वीपेक्षा अधिक भाजपचे नगरसेवक निवडून येतील असा दावा माजी मंत्री गिरीश महाजन यांनी करताना भुजबळांनी पालकमंत्री या नात्याने राज्य सरकारकडून अडीच वर्षात किती निधी आणून दिला हे सांगावे असे आव्हान महाजन यांनी देत शहर राजकारणात भुजबळांविरोधात दंड थोपटले.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com